(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Finn Allen : आरसीबीनं ज्याला रिलीज केलं, त्यानंच पाकिस्तानविरुद्ध तब्बल16 षटकार ठोकत 137 धावांचा पाऊस पाडला!
Finn Allen : फिन अॅलनने पाकिस्तानविरुद्ध केवळ 62 चेंडूंचा सामना केला आणि 220 च्या अविश्वसनीय स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना 137 धावा केल्या. त्याच्या खेळीत 4 चौकार आणि 16 षटकारांचा समावेश होता.
Finn Allen : आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग 2024 मार्च-एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. आयपीएलच्या या नव्या सीझनबद्दल प्रत्येकजण खूप उत्सुक आहे. आयपीएल 2024 चा मिनी लिलाव गेल्या 19 डिसेंबर रोजी झाला होता. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी लिलावात सर्व विक्रम मोडीत काढले. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये किवी संघाचा स्टार आणि स्फोटक फलंदाज फिन अॅलनने खेळलेली इनिंग पाहिल्यास त्याने अशी खेळी आधी खेळली असती, तर कदाचित त्यालाही मोठी बोली लागली असती.
Finn Allen 16 sixes vs Pakistan today. 🫡#NZvPAK pic.twitter.com/NU0iA8GEj5
— 𝐾𝑖𝑤𝑖𝑠 𝐹𝑎𝑁𝑠 🇳🇿 (@NZcricketfans) January 17, 2024
फिन अॅलनकडून पाकिस्तानची धुळदाण
सध्या न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात 5 सामन्यांची T20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तिसरा सामना आज म्हणजेच 17 जानेवारी रोजी खेळला गेला. या सामन्यात सलामीवीर फिन अॅलनने कमाल केली. त्याने केवळ 62 चेंडूंचा सामना केला आणि 220 च्या अविश्वसनीय स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना 137 धावा केल्या. त्याच्या खेळीत 4 चौकार आणि 16 षटकारांचा समावेश होता. ही खेळी पाहून सर्व आयपीएल फ्रँचायझींना पश्चाताप होत असेल. अॅलन आयपीएल 2024 च्या लिलावाचा भाग होता. त्याची मूळ किंमत फक्त 75 लाख रुपये होती. तथापि, कोणत्याही फ्रेंचायझीने त्याच्यामध्ये स्वारस्य दाखवले नाही.
Finn Allen smashed 6,4,4,4,6,0 vs Shaheen in a single over in 1st T20I.
— Johns. (@CricCrazyJohns) January 17, 2024
Finn Allen smashed 6,4,4,6,6,1 vs Rauf in a single over in 3rd T20I. pic.twitter.com/AEsWZo9NAy
आरसीबीकडून झाला होता रिलीज
24 वर्षीय फिन अॅलन हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. इतकेच नाही तर RCB ने IPL 2024 च्या लिलावापूर्वी रिलीज केले होते. आता फिनचे हे रूप पाहून बंगळुरूला कुठेतरी थोडा पश्चाताप झाला असेल. फिन ऍलनने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 38 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 165 च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना 1025 धावा केल्या त्याने 2 शतके आणि 4 अर्धशतकेही झळकवली आहेत.
FINN ALLEN DESTROYED PAKISTAN...!!!!!
— Johns. (@CricCrazyJohns) January 17, 2024
- 34(15) in the first T20I.
- 74(41) in the second T20I.
- 137(62) in the third T20I.
One of the most incredible batting in a T20I series. 🤯🔥 pic.twitter.com/onh7qOeCUE
इतर महत्वाच्या बातम्या