FIH Women's Junior WC 2022: सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं! भारतीय महिला ज्युनियर हॉकी संघाचा उपांत्य फेरीत पराभव
FIH Women's Junior WC 2022: या स्पर्धेतील उपांत्य फेरीत भारताला तीन वेळच्या चॅम्पियन असलेल्या नेदरलँडकडून 0-3 नं पराभव स्वीकारावा लागलाय.
FIH Women's Junior WC 2022: एफआयएच ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला ज्युनियर हॉकी संघाचं सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीत भारताला तीन वेळच्या चॅम्पियन असलेल्या नेदरलँडकडून 0-3 नं पराभव स्वीकारावा लागलाय. नेदरलँडसाठी, टेसा बीट्स्मा (12वे), लुना फोके (53वे) आणि झिप डिके (54वे) यांनी गोल करून सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली. भारतीय महिला ज्युनिअर हॉकी संघानं उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाचा पराभव केला आहे.
भारतीय संघानं या सामन्यात सकारात्मक सुरुवात केली. या सामन्यादरम्यान भारतासाठी सर्वाधिक गोल करणारी मुमताज खान संघाला आघाडी मिळवून देण्याच्या प्रयत्न केला. परंतु, नेदरलँडची कर्णधार सलीमा टेटेमुळं ती अपयशी ठरली. भारतीय संघानं सुरुवातीच्या क्वार्टरमध्ये तीन पेनल्टी क्वार्टर मिळवले. परंतु, खेळाडूंना त्याचं गोलमध्ये रूपांतर करता आलं नाही.
बीट्स्माच्या 12 व्या मिनिटाला नेंदरलँड्ससाठी पहिला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. एका गोलने पिछाडीवर पडल्याने भारतीय खेळाडू दडपणाखाली आला. सामन्यातील दुसरा क्वार्टर बरोबरीमध्ये सुटला. परंतु, तिसऱ्या क्वार्टरमध्ये नेदरलँड संघानं पूर्ण वर्चस्व राखलं. संघाच्या आक्रमक खेळामुळं भारतीय बचावफळीवर दबाव कायम होता. यावेळी भारतीय संघ गोल करण्याची संधी शोधत होता. मात्र, त्यांना यश मिळालं नाही.
चौथ्या क्वार्टरमध्ये नूर ओमरानीच्या शानदार पासवर फॉकेनं रिव्हर्स शॉट मारून नेदरलँडला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. पुढच्याच मिनिटाला झिप डिकीच्या गोलनं सामना भारताच्या आवाक्याबाहेर गेला. सामन्याच्या अखिरेस भारताला नेदरलँडकडून 3-0 च्या फरकानं पराभव स्वीकारावा लागला.
हे देखील वाचा-
- RCB on Virat Kohli Wicket: विराटला चुकीच्या पद्धतीनं आऊट देण्याच्या निर्णयावर आरसीबीची मोठी प्रतिक्रिया
- IPL 2022: चेन्नईच्या 'या' निर्णयावर रवी शास्त्रींनी उपस्थित केले प्रश्न, समोर ठेवली संघाची सर्वात मोठी चूक
- IPL 2022: विराटमुळं डेटवर जायची थांबली 'ही' तरूणी! भरमैदानात पोस्टर झळकावून सांगितलं कारण, पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या