Kylian mbappe : 23 वर्षांचा एम्बाप्पे एकटा अर्जेंटिनाला भिडला, एकट्यानं 4 गोल मारूनही फ्रान्स हरला, सात्वंनासाठी थेट राष्ट्रपती मैदानात, पाहा VIDEO
Argentina vs France : फिफा विश्वचषक 2022 (fifa world cup 2022) स्पर्धेच्या फायनलमध्ये पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने 4-2 असा विजय मिळवला आहे. पण सामन्यात एम्बाप्पेची झुंज खरंच वाखाणण्याजोगी होती.
Kylian mbappe in ARG vs FRA Final : फिफा विश्वचषक स्पर्धेच्या (Fifa WC) अंतिम सामन्यात (Fifa World Cup 2022 Final) पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनानं फ्रान्सवर 4-2 (France vs Argentina) असा विजय मिळवला. या विजयासह मेस्सीच्या अर्जेंटिनानं विश्वचषक जिंकला आहे, ज्यामुळे जगप्रसिद्ध मेस्सीची चर्चा संपूर्ण जगात होत आहे. पण असं असतानाही फ्रान्सचा युवा स्टार फुटबॉलपटू कायलिन एम्बाप्पे (Kylian Mbappe) यानं दिलेली झुंजही खरचं वाखाणण्याजोगी होती. पेनल्टीशूटआऊटमधील गोल पकडत तब्बल 4 गोल करणाऱ्या एम्बाप्पेनं एकहाती झुंज दिली, ज्यामुळे तो वर्ल़्ड कप जिंकला नसला तरी त्याच्या पराभवाची चर्चाही जगभर होत आहे.
सामन्यात सुरुवातीपासून अर्जेंटिना संघाने दमदार खेळ दाखवला. 23 व्या मिनिटाला पेनल्टीच्या मदतीनं मेस्सीनं आणि 36 व्या मिनिटाला एन्जल डी मारिया याने गोल करत अर्जेंटिनाची आघाडी 2-0 केली. ज्यानंतर तब्बल 79 मिनिटांपर्यंत 2-0 अशा आघाडीवर असणाऱ्या अर्जेंटिनाचा विजय होईलच असं वाटत होतं. पण तेव्हाच अवघ्या 23 वर्षीय कायलिन एम्बाप्पे याने 80 व्या मिनिटाला पेनल्टीच्या मदतीनं गोल करत फ्रान्सच्या आशा जिवंत केल्या. त्यानंतर लगेचच 81 व्या आणखी एक गोल एम्बाप्पेनं केला आणि सामन्यात बरोबरी साधली आणि हातातून निसटणारा सामना एम्बाप्पेनं धरुन ठेवला. पण एम्बाप्पेची झुंज इथं संपणारी नव्हती. अतिरिक्त वेळेत 108 व्या मिनिटाला मेस्सीनं गोल केला आणि अतिरिक्त वेळ संपायला काही मिनिटं शिल्लक असताना 118 व्या मिनिटाला एम्बाप्पेनं आणखी एक गोल करत पिक्चर अभी बाकी हे! हे दाखवून दिलं. ज्यामुळे अतिरिक्त वेळेनंतर पेनल्टी शूटआऊट झालं. ज्यातही एम्बाप्पे चमकला. त्यानंतर पहिलीच किक घेत गोल केला पण त्यानंतरच्या खेळाडूंना खास कामगिरी करता आली नाही आणि अर्जेंटिनाच्या स्ट्रायकर्सनी कोणतीच चूक न केल्यामुळे सामना अखेर फ्रान्सनं 4-2 च्या फरकानं गमावला. पण असं असूनही एम्बाप्पेनं दिलेल्या एकहाती झुंजीमुळे त्यानं सर्वांची मनं जिंकली. विशेष म्हणजे सामना गमावल्यावर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) स्वत: एम्बाप्पेचं सांत्वंन करायला मैदानात आले होते.
Presidente Emmanuel Macron consolando Mbappé após o jogo, mas o Tite não teve coragem de consolar os jogadores do Brasil. pic.twitter.com/jYUqeBPrWT
— Jonas Di Andrade (@jonasdiandrade) December 18, 2022
France president Emmanuel Macron consoles players after #FifaWorldCup final loss https://t.co/F1lJs1pisB #ARG #FRA pic.twitter.com/P7eMQQPutS
— Indy Football (@IndyFootball) December 18, 2022
1966 नंतर प्रथमच हॅट्रिक
विशेष म्हणजे या सामन्यात कायलिन एम्बाप्पे यानं सलग तीन गोल करत दमदार अशी हॅट्रिक केली. ज्यामुळे फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये 1966 नंतर पहिल्यांदाच हॅट्रिकची नोंद झाली. कायलिनच्या या कामगिरीनंतर यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक गोल त्याच्याच नावावर झाले. ज्यामुळं 8 गोल्स स्पर्धेत करत तो गोल्डन बूटचा मानकरी ठरला. त्यानं मेस्सीला (7 गोल) मात दिली.
हे देखील वाचा-