एक्स्प्लोर

Fifa World Cup Final Result : मेस्सीचं स्वप्न साकार! फिफा विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिना विजयी, पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने फ्रान्सवर मात

Argentina vs France : फिफा विश्वचषक 2022 (fifa world cup 2022) स्पर्धेच्या फायनलमध्ये एक रोमहर्षक लढत पाहायला मिळाली, ज्या लढतीच्या अखेरीस पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिना संघ 4-2 ने विजयी झाला.

ARG vs FRA, Fifa World Cup 2022 Final : फिफा विश्वचषक स्पर्धेच्या  (Fifa WC) अंतिम सामन्यात (Fifa World Cup 2022 Final) फुटबॉल इतिहासातील एक सर्वात रोमहर्षक असा सामना पाहायला मिळाला. आधी अतिरिक्त वेळ त्यानंतर पेनल्टी शूटआऊट असं सारंकाही असणाऱ्या या सामन्यात पेनल्टी शूटआऊट झालं. ज्यामध्ये अर्जेंटिना संघाने फ्रान्सवर 4-2 (France vs Argentina) असा विजय मिळवत वर्ल्ड कप जिंकला आहे. विशेष म्हणजे ज्या मेस्सीसाठी (Lionel Messi) अर्जेंटिनाला हा कप जिंकायचा होता, त्या मेस्सीनेच सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. पेनल्टी शूटआऊटमधील गोल पकडून एकून तीन गोल मेस्सीनं केले. विशेष म्हणजे अर्जेंटिनाचा गोलकिपर एमिलानो मार्टिनेज (Emiliano Martinez) याने उत्कृष्ट खेळ दाखवत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी निभावली. 

सामन्यात सुरुवातीपासून अर्जेंटिना संघाने आपला दबदबा ठेवला होता. अगदी सुरुवातीच्या काही मिनिटांपासून त्यांनी फ्रान्सवर आक्रमणं करण्यास सुरुवात केली. ज्यानंतर 23 व्या मिनिटाला फ्रान्सच्या चूकीमुळं अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली. मेस्सीनं ही पेनल्टी घेताना कोणतीही चूक न करता गोल करत अर्जेंटिनाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. ज्यानंतर संघाचा अनुभवी आणि स्टार खेळाडू एन्जल डी मारिया याने 36 व्या मिनिटाला अप्रतिम असा गोल करत अर्जेंटिनाची आघाडी 2-0 केली. हाल्फ टाईमनंतर 79 मिनिटांपर्यंत ही आघाडी कायम होती, ज्यामुळे अर्जेंटिना सहज सामना जिंकेल असंच वाटू लागलं होतं.

...आणि कायलिनची एन्ट्री

79 मिनिटांपर्यंत 2-0 अशा आघाडीवर असणाऱ्या अर्जेंटिनाचा विजय होईलच असं वाटत असताना 23 वर्षीय स्टार फुटबॉलपटू कायलिन एम्बाप्पे याने 80 व्या मिनिटाला पेनल्टीच्या मदतीनं गोल करत फ्रान्सच्या आशा जिवंत केल्या. त्यानंतर लगेचच 81 व्या मिनिटाला एम्बाप्पेनं आणखी एक उत्कृष्ट गोल करत सामन्यात बरोबरी साधली... आणि बघता बघता सामना पलटू लागला...90 मिनिटं झाली काही मिनिटं अधिकची दिली गेली पण दोन्ही संघाना गोल करता आला नाही आणि सामन्यात एक्स्ट्रा टाईम देण्यात आला...

एक्सट्रा टाईममध्ये मेस्सी एम्बाप्पे युद्ध

अतिरिक्त वेळेत 108 व्या मिनिटाला लिओनल मेस्सीनं एक अप्रतिम असा गोल केला... गोल झाला तेव्हा मेस्सी ऑफसाईड होता असं वाटत होतं पण रेफरीनं नीट चेक केलं असता तो ऑफसाईड नव्हता, ज्यामुळे 108 व्या मिनिटीला अर्जेंटिनाचा तिसरा गोल झाला आणि आता तरी ते सामना जिंकतील असं वाटू लागलं. पण सामना अजून बाकी होता...एक्स्ट्रा टाईम संपायला 2 मिनिटं असताना अर्जेंटिना संघाच्या खेळाडूच्या हाताला बॉल गोलपोस्टजवळ लागला आणि त्यामुळे फ्रान्सला पेनल्टी मिळाली, जी एम्बाप्पेनं गोलमध्ये बदलत 3-3 अशी गोलसंख्या केली. एम्बाप्पेनं या गोलसह हॅट्रिक केली ज्यामुळे 1966 नंतर पहिल्यांदाच विश्वचषक फायनलमध्ये कोणीतरी हॅट्रिक केली होती... ज्यामुळे अतिरिक्त वेळेनंतर पेनल्टी शूटआऊट खेळवण्यात आलं.

एमिलानो मार्टिनेजनं अर्जेंटिनाला तारलं

अतिरिक्त वेळेनंतर पेनल्टी शूटआऊट घेण्यात आलं. कोणत्याही पेनल्टी शूटआऊटमध्ये गोलकिपरवर मोठी जबाबदारी असते. फायनलच्या या पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा गोलकिपर एमिलानो मार्टिनेज याने ही जबाबदारी चोखरित्या पार पाडत उत्कृष्ट खेळ दाखवला, अर्जेंटिनाच्या स्ट्रायकर्सने देखील एकही संधी व्यर्थ न घालवत एक किक राखून 4-2 ने पेनल्टी शूटआऊट जिंकला आणि सामन्यासह विश्वचषक 2022 अर्जेंटिनाला जिंकवून दिला.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 08 PM : 19 May 2024Mumbai Lok Sabha Elections : मुंबईतील 6 मतदारसंघांमध्ये मतदान, कोणकोणत्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणालाPraful Patel on Sharad Pawar : शरद पवारांनी केलेल्या दाव्यांबद्दल पटेलांचं उत्तर, म्हणाले होय मी...CM Eknath Shinde Thane : तयारी संपली, उद्या परिक्षेची वेळ, मुख्यमंत्री शिंदे दिघेंच्या स्मृतीस्थळी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसमोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसमोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
Embed widget