Fifa Suspended AIFF : भारतीय फुटबॉल फेडरेशनवरीन निलंबन रद्द होण्याची शक्यता, सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर आशा पल्लवीत
FIFA : आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ अर्थात फिफाने (FIFA) अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर आता यासंबधी एक महत्त्वाची सुनावणी सुप्रीट कोर्टात झाली.
Fifa Suspended AIFF Case : जागतिक फुटबॉल संघटना म्हणजेच फिफानं (International Federation of Association Football) भारतीय फुटबॉल महासंघावर काही दिवसांपूर्वीच निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान यासंबधी एक महत्त्वाची सुनावणी सुप्रीट कोर्टात झाली असल्याने हे निलंबन मागे घेण्यात येऊ शकते. भारतीय फुटबॉल महासंघात (AIFF) तिसऱ्या पक्षाकडून होत असलेल्या हस्तक्षेपाच्या मुद्यावरुन फिफाने ही कारवाई केली होती, ज्यानंतर आता AIFF मधील व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त केलेली तीन सदस्यीय प्रशासकीय समिती (सीओए) न्यायालयाने रद्द केल्याने फिफाही निलंबन मागे घेण्याची शक्याता आहे.
Supreme Court terminates the CoA set up to manage AIFF.
— ANI (@ANI) August 22, 2022
SC says it is passing the order to facilitate revocation of suspension of AIFF by FIFA and holding of Under-17 FIFA World Cup in India as well as allowing participation of teams from India in international events. pic.twitter.com/NEs6DPrGrt
भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर भारतीय फुटबॉल क्लब्सना परदेशातील स्पर्धांत खेळणं अवघड झालं होतं. यामुळे असल्याने भारतीय फुटबॉल चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती. पण आता सुप्रीम कोर्टाच्या नव्या सुनावणीमुळे निलंबन मागे होण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच भारतात घेण्यात येणारा यंदाचा अंडर 17 महिला विश्वचषकही भारतात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आजच्या सुनावणीत न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले, “भारतीय फुटबॉल महासंघाच्या व्यवस्थापनाचे काम केवळ कार्यकारी महासचिव यांच्या नेतृत्वाखालील एआयएफएफ प्रशासनाद्वारे पाहिले जाईल.” तसंच AIFF चं अंतरिम ऑडिट अहवालही न्यायलाने मागवला आहे.
फिफा काय आहे?
International Federation of Association Football अर्थात 'फिफा' ही फुटबॉलबाबतची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. 'फिफा' हे फ्रेंचमधील Fédération internationale de Football Association याचे संक्षिप्त रुप आहे. क्रिकेटमध्ये आयसीसीकडून नियमन केले जाते. त्याच प्रमाणे फिफाकडून फुटबॉलचे नियमन केले जाते. फुटबॉलशी संबंधित आंतरराष्ट्रीय सामने, विविध स्पर्धांचे आयोजन फिफाकडून करण्यात येते. जगातील जवळपास 211 देश फिफाचे सदस्य आहेत.
हे देखील वाचा-