एक्स्प्लोर
फिरोजशाह कोटला मैदानाच्या प्रवेशद्वाराला सेहवागचं नाव
कोटला मैदानाच्या प्रवेशद्वाराला नाव देण्यात आलेला सेहवाग दिल्लीचा पहिलाच क्रिकेटर आहे.
दिल्ली : राजधानी दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानाला टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर वीरेंद्र सेहवागचं नाव देण्यात आलं आहे. सेहवागनेही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. कोटला मैदानाच्या प्रवेशद्वाराला नाव देण्यात आलेला सेहवाग दिल्लीचा पहिलाच क्रिकेटर आहे.
कोटला मैदानाचं दुसऱ्या क्रमांकाचं प्रवेशद्वार सेहवागच्या नावाने ओळखलं जाणार आहे. सेहवागने काही माजी खेळाडूंच्या उपस्थितीत या प्रवेशद्वाराचं उद्घाटन केलं. डीडीसीएचा हा सकारात्मक निर्णय असल्याचं सेहवाग म्हणाला. शिवाय येत्या काळात ड्रेसिंग रुम, स्टँड आणि प्रवेशद्वारांना इतर खेळाडूचं नाव देण्यात येईल, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात यावं, अशी विनंती केली होती. मात्र तेव्हा दुसऱ्या कार्यक्रमाचं नियोजन होतं. त्यामुळे यापुढेही तुम्हाला असे कार्यक्रम पाहायला मिळतील, असं सेहवाग म्हणाला.
सेहवाग रणजीत सर्वात जास्त दिल्लीकडून खेळला होता. मात्र दिल्ली रणजी ट्रॉफी विजेत्या संघात नसल्यामुळे सेहवागने खंतही व्यक्त केली. दिल्लीने 2007-08 साली रणजी ट्रॉफी जिंकली तेव्हा सेहवाग ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता.
गुजरातविरुद्ध अंडर-19 सामना जिंकणं हा या मैदानावरील सर्वात अविस्मरणीय क्षण होता, असं सेहवागने सांगितलं. त्या सामन्यात आशिष नेहराने चांगली गोलंदाजी केली होती. आपण केवळ 50-60 धावाच करु शकलो, मात्र तो अविस्मरणीय सामना होता, असं सेहवागने सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement