एक्स्प्लोर
VIDEO : चाहत्याचा रोहित शर्माला किस करण्याचा प्रयत्न
एका 'क्रेझी फॅन'ने विजय हजारे ट्रॉफीतील सामना सुरु असतानाच थेट मैदानात घुसून रोहित शर्माला किस करण्याचा प्रयत्न केला.

बंगळुरु : अभिनेते असो वा क्रिकेटपटू, चाहत्यांच्या चित्र-विचित्र वागण्याचा अनुभव त्यांना कधी ना कधी येतोच. टीम इंडियाचा धडाकेबाज क्रिकेटपटू रोहित शर्माला विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना असाच एक अनुभव आला. एका 'क्रेझी फॅन'ने सामना सुरु असतानाच थेट मैदानात घुसून रोहितला किस करण्याचा प्रयत्न केला. विजय हजारे चषक 2018-19 मध्ये रोहित शर्मा मुंबई संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. बंगळुरुच्या जस्ट क्रिकेट अकॅडमी ग्राऊण्डवर रविवारी रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईने बिहारचा 9 विकेट्सनी धुव्वा उडवला. रोहितच्या 33 धावांच्या जोरावर मुंबईने 12.3 षटकांतच बिहारचं 69 धावांचं आव्हान गुंडाळलं. 11 वं षटक सुरु होतं.. रोहित पिचवर असताना प्रेक्षागृहातून एक चाहता अचानक पिचच्या दिशेने धावत सुटला. कोणाला काही समजायच्या आतच रोहितच्या समोर तो उभा ठाकला. आधी तो रोहितच्या पाया पडला. त्यानंतर त्याने रोहितला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावर त्याचं भागलं नाही, त्यामुळे त्याने रोहितच्या गालावर चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. चाहत्याने दुसऱ्यांदा किस करण्याचा प्रयत्न करताच रोहितने मान वळवली. त्यामुळे चाहता काहीसा ओशाळला आणि पुन्हा पाया पडून निघून गेला. मात्र पुन्हा प्रेक्षकांच्या स्टँडमध्ये जाताना त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. जल्लोष करत, उंच उड्या मारत त्याने स्टँडच्या दिशेने धाव घेतली. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विशेष म्हणजे क्रिकेटपटू युझवेंद्र चहलने रोहित शर्मासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यामध्ये तो रोहितकडे एकटक पाहताना दिसत आहे. रोहितची पत्नी रितीकाला टॅग करुन त्याने 'वहिनी, तू जळत असशील ना?' असं गमतीत म्हटलं. याला उत्तर म्हणून रितीकाने या बातमीचा फोटो इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट करुन 'हा आपल्या दोघांचा स्पर्धक आहे' असं कॅप्शन दिलं आहे.
खरं तर पाच पोलिस कर्मचारी मैदानात उपस्थित असणं अपेक्षित असल्याचं 'कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन'ने सांगितलं, मात्र ते प्रेक्षकांच्या स्टँडमध्ये मागे बसलेले असल्यामुळे त्याला रोखू शकले नाहीत.@Ateet_Sharma @manoj_dimri @vikrantgupta73 Rohit Sharma Fan In Vijay Hazare trophy pic.twitter.com/GGv6ehPvWb
— Abhinav Rai (@Abhinav9560) October 15, 2018
विशेष म्हणजे क्रिकेटपटू युझवेंद्र चहलने रोहित शर्मासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यामध्ये तो रोहितकडे एकटक पाहताना दिसत आहे. रोहितची पत्नी रितीकाला टॅग करुन त्याने 'वहिनी, तू जळत असशील ना?' असं गमतीत म्हटलं. याला उत्तर म्हणून रितीकाने या बातमीचा फोटो इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट करुन 'हा आपल्या दोघांचा स्पर्धक आहे' असं कॅप्शन दिलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
विश्व
व्यापार-उद्योग
नागपूर























