एक्स्प्लोर

कोरोनानंतरच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय मालिकेत इंग्लंडची सरशी; स्टुअर्ट ब्रॉडची विक्रमी कामगिरी

मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटीत स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडनं वेस्ट इंडिजचा 269 धावांनी धुव्वा उडवला आणि तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी खिशात घातली.

नवी दिल्ली : कोरोना संकटानंतरच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटी मालिकेत इंग्लंडनं सरशी साधली. मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटीत स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडनं वेस्ट इंडिजचा 269 धावांनी धुव्वा उडवला आणि तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी खिशात घातली.

या सामन्यात इंग्लंडनं विंडिजसमोर 399 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्सच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजचा दुसरा डाव 129 धावातच आटोपला. ब्रॉडनं पहिल्या डावात सहा तर दुसऱ्या डावात विंडीजच्या चार फलंदाजांना माघारी धाडून इंग्लंडच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. तर वोक्सनं दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या.

त्याआधी इंग्लंडनं पहिल्या डावात 369 धावा उभारल्या होत्या. त्यानंतर विंडीजचा पहिला डाव 197 धावात गुंडाळून 172 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावातही इंग्लिश फलंदाजांनी शानदार फलंदाजी करताना दोन बाद 226 धावांवर आपला डाव घोषित केला. इंग्लंडच्या या डावात सलामीच्या डॉमनिक सिबले (56) आणि रोरी बर्न्स (90) यांच्यासह कर्णधार ज्यो रुटनंही (68) अर्धशतक झळकावलं. त्यामुळे इंग्लंडला 398 धावांची भक्कम आघाडी घेता आली.

ब्रॉडच्या कसोटीत 500 विकेट्स पूर्ण

मॅन्चेस्टर कसोटीत वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनं कसोटी कारकीर्दीत 500 विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला. दुसऱ्या डावात विंडीजच्या क्रेग ब्रेथवेटला माघारी धाडत ब्रॉडनं 500 विकेट्सचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा ब्रॉड हा जगातला सातवा तर जेम्स अँडरसननंतर इंग्लंडचा दुसराच गोलंदाज ठरला. ब्रॉडनं आतापर्यंत 140 कसोटी सामन्यात इंग्लंडचं प्रतिनिधीत्व करताना 28 च्या सरासरीनं 501 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.

500 पेक्षा जास्त कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज

मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) – 800

शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) – 708

अनिल कुंबळे (भारत) – 619

जेम्स अँडरसन (इंग्लंड) – 589*

ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) – 563

कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) – 519

स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) - 501

विंडीजचं मालिकाविजयाचं स्वप्न अधुरं

जेसन होल्डरच्या विंडीज संघानं साऊदम्प्टनची पहिली कसोटी जिंकून इंग्लंडचा धक्का दिला होता. 1988 नंतर विंडीजला इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. त्यामुळे पहिल्या कसोटी विजयानंतर विंडीज चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण इंग्लंडनं मॅन्चेस्टरमध्ये खेळवण्यात आलेल्या लागोपाठच्या दोन्ही कसोटी जिंकून विंडीजला ऐतिहासिक मालिकाविजयापासून दूर ठेवलं.

बायो सिक्युअर वातावरणात खेळवण्यात आलेली पहिली मालिका

कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत सुरक्षित वातावरणात अर्थात बायो सिक्युअर वातावरणात ही मालिका यशस्वीरित्या खेळवण्यात आली. दोन्ही संघांचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांचा बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क ठेवण्याची मुभा नव्हती. त्यांच्या वेळोवेळी तपासण्याही घेण्यात येत होत्या. अशा रितीनं या मालिकेचं यशस्वी आयोजन करुन इंग्लंड क्रिकेट बोर्डानं इतर देशांसमोर एक नवा पायंडा घालून दिला.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg Test Day-2 : अफगाणिस्तानवर टीम इंडियाची घट्ट पकड; पदार्पणवीर मानव सुथारची फिरकीची जादू, दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
Ind vs Afg Test Update Day-2 : अफगाणिस्तानवर टीम इंडियाची घट्ट पकड; पदार्पणवीर मानव सुथारची फिरकीची जादू, दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
FIFA World Cup : दुनिया मेस्सी-रोनाल्डोच्या प्रेमात वेडी, अन् भारत अजूनही क्रिकेटच्याच दावणीला बांधलेला! फुटबॉल का हरला, क्रिकेट का जिंकलं? वाचा Inside Story
दुनिया मेस्सी-रोनाल्डोच्या प्रेमात वेडी, अन् भारत अजूनही क्रिकेटच्याच दावणीला बांधलेला! फुटबॉल का हरला, क्रिकेट का जिंकलं? वाचा Inside Story
Suryakumar Yadav Retirement Fact Check : सूर्यकुमार यादवची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती? श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद गेल्यानंतर 'X' वरील पोस्ट व्हायरल, नेमकं काय झालं?
सूर्यकुमार यादवची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती? श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद गेल्यानंतर 'X' वरील पोस्ट व्हायरल, नेमकं काय झालं?
IND vs AFG Test Empty Stadium : थाट मोठा पण प्रेक्षक गायब! 'विराट पर्व' संपताच टीम इंडियाची कसोटी झाली पोरकी; बीसीसीआयवर रडण्याची वेळ, 50 रुपयांतही कोणी फिरेना
थाट मोठा पण प्रेक्षक गायब! 'विराट पर्व' संपताच टीम इंडियाची कसोटी झाली पोरकी; बीसीसीआयवर रडण्याची वेळ, 50 रुपयांतही कोणी फिरेना

व्हिडीओ

Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जय भीमच्या घोषणा देतात ही अराजकता आहे? फडणवीसांनी थोडा विचार करावा, महाराष्ट्राचे सीएम आहात, यूपीचे नाही; मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर अभिजितचा पलटवार
जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जय भीमच्या घोषणा देतात ही अराजकता आहे? फडणवीसांनी थोडा विचार करावा, महाराष्ट्राचे सीएम आहात, यूपीचे नाही; मुख्यमंत्र्यांच्या 'अराजकतावादी' टीकेवर अभिजितचा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
राहुल गांधी म्हणाले, 18 वर्षीय सार्थक CBI पेक्षा हुशार ठरला; सीबीएसई 12वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीतील COEMPT कंपनीच्या टेंडरची सार्थककडून पोलखोल
राहुल गांधी म्हणाले, 18 वर्षीय सार्थक CBI पेक्षा हुशार ठरला; सीबीएसई 12वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीतील COEMPT कंपनीच्या टेंडरची सार्थककडून पोलखोल
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार
BCPL: शेअर 100 रुपयांपेक्षा कमी, पूर्व रेल्वेकडून 4.72 कोटींच्या कामाची ऑर्डर, सोमवारी शेअरमध्ये तेजी की घसरण? 
शेअर 100 रुपयांपेक्षा कमी, पूर्व रेल्वेकडून 4.72 कोटींच्या कामाची ऑर्डर, सोमवारी शेअरमध्ये तेजी की घसरण? 
Donald Trump : इराणच्या खजिन्यावर अमेरिकेची नजर, आता संपत्तीचा संघर्ष, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्लॅननं संकट वाढणार? 
इराणच्या खजिन्यावर अमेरिकेची नजर, आता संपत्तीचा संघर्ष, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्लॅननं संकट वाढणार? 
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
Iran War Live Update: 'आता परिणामांसाठी अमेरिका पूर्णपणे जबाबदार असेल' अमेरिकेने शस्त्रसंधीचा भंग केला, इराणचा गंभीर आरोप
'आता परिणामांसाठी अमेरिका पूर्णपणे जबाबदार असेल' अमेरिकेने शस्त्रसंधीचा भंग केला, इराणचा गंभीर आरोप
Embed widget