एक्स्प्लोर
कठीण परिस्थितीत इंग्लंडचा संघ आमच्यापेक्षा जास्त धैर्याने खेळला : विराट
विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 101 धावांच्या भागिदारीचा अपवाद वगळता, भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या आक्रमणासमोर पुन्हा लोटांगण घातलं.
साऊदम्पटन : इंग्लंडने भारताचा दुसरा डाव 184 धावांत गुंडाळून साऊदम्प्टनच्या चौथ्या कसोटीत 60 धावांनी विजय साजरा केला. या कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडला दुसऱ्या डावात 271 धावांत रोखलं. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 245 धावांचं आव्हान होतं. पण विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 101 धावांच्या भागिदारीचा अपवाद वगळता, भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या आक्रमणासमोर पुन्हा लोटांगण घातलं.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने या पराभवाचं कारण वरच्या फळीतील फलंदाजीचं अपयश असल्याचं सांगितलं आहे. सोबतच इंग्लंडच्या खेळाडूंनी भारताच्या तुलनेत कठीण परिस्थितीत जास्त धैर्य दाखवलं, असंही विराट म्हणाला. सामनावीर मोईन अली (71/4) सहीत इतर खेळाडूंच्या गोलंदाजीने भारतावर विजय सोपा केला.
सामन्यानंतर विराट बोलत होता. ''इंग्लंडने आमच्यासमोर आव्हान ठेवण्यासाठी चांगली कामगिरी केली. मात्र ज्या पद्धतीची खेळपट्टी होती, ते आमच्यासाठी आव्हानात्मक होतं. ही विजयाची चांगली संधी आहे असं आम्हाला वाटलं होतं, पण आम्हाला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही,'' असं विराट म्हणाला.
भारतीय संघाने दुसऱ्या डावात उपहारापर्यंतच 42 धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. मात्र उपहारानंतर भारताची परिस्थिती तीन बाद 123 अशी होती. यानंतर सात विकेट केवळ 61 धावांमध्ये गेल्या. यजमान संघाने 69.4 षटकांमध्ये भारतीय संघाला 184 धावांमध्ये बाद केलं.
''इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि आमच्यावर दबाव आणला. याचं श्रेय त्यांच्या चांगल्या गोलंदाजीला जातं. तुम्ही मोठी भागीदारी करुनच सामना जिंकू शकता, पण आम्ही कायम दबावात राहिलो,'' अशी कबुली विराट कोहलीने दिली.
''कठीण परिस्थितीमध्ये इंग्लंडचा संघ भारताच्या तुलनेत जास्त धैर्याने खेळला. खालच्या फळीतील योगदान अत्यंत महत्त्वाचं होतं,'' असं विराट म्हणाला.
यजमान इंग्लंडने ही कसोटी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना सात सप्टेंबर रोजी लंडनमध्ये खेळवला जाईल.
''अखेरच्या सामन्यात चौथ्या सामन्यातील सकारात्मक गोष्टींचा विचार करावा लागेल. मला नाही वाटत की आम्ही जास्त चुका केल्या. विजयाचं श्रेय इंग्लंडच्या संघाला जातं, कारण, त्यांनी चांगली कामगिरी केली,'' अशी प्रतिक्रिया विराटने दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement