(Source: ECI/ABP News/ABP Majha)
England vs South Africa : साहेबांची भारतात काही केल्या डाळ शिजेना! इंग्लंडचा 400 धावांचा पाठलाग करताना निम्मा संघ तंबूत परतला
England vs South Africa : दक्षिण आफ्रिकेनं 400 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर इंग्लंडची तारांबळ उडाली आहे. आठव्या षटकांतच इंग्लंडची 5 बाद 67अशी स्थिती झाली आहे.
England vs South Africa : दक्षिण आफ्रिकेनं 400 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर इंग्लंडची तारांबळ उडाली आहे. आठव्या षटकांतच इंग्लंडची 5 बाद 67अशी स्थिती झाली आहे. मार्को जानसेनने दोन झटके दिले, तर नगिडी आणि रबाडाने एक विकेट घेतली. बेन स्टोक्स 5 धावांवर बाद झाला. 4 बाद 38 अशी स्थिती झाल्यानंतर हॅरी ब्रुक आणि बटलरने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, पण बटलर अवघ्या 15 धावांवर बाद झाला.
Jos Buttler dismissed for 15 in 7 balls.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 21, 2023
England getting destroyed at the Wankhede Stadium - 67/5. pic.twitter.com/tHhkgOkU17
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने (England vs South Africa) आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध तब्बल 399 धावांचा डोंगर उभा केला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने अक्षरश: इंग्लंडच्या गोलंदाजांची चौफेर धुलाई करताना 399 धावा कुटल्या. चार धावांवर पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर डिकाॅक बाद झाला. दुसऱ्या विकेटसाठी रिझा हेंड्रिक आणि वॅन देर दुसेन यांनी 121 धावांची भागीदारी केली. हेंड्रिक 85 धावांवर बाद झाला. दुसेन 60 धावा करून बाद झाला. मारक्रमने 44 धावांचे योगदान दिले. मिलर अवघ्या 5 धावांवर परतला.
Ben Stokes dismissed for 5 in 8 balls - England 38/4 now.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 21, 2023
What a match at the Wankhede Stadium. pic.twitter.com/zuoYkyUXNr
यानंतर पाचव्या क्रमांकावर क्लासेन आणि सातव्या क्रमांकावर मार्को जानसेन यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची पुरती धुलाई करताना धावांचा पाऊस पडला. या दोघांनी शेवटच्या 10 षटकात तब्बल 143 धावाचा पाऊस पाडत आफ्रिकेला 400 च्या घरात नेऊन ठेवले. शेवटच्या षटकात टिचून गोलंदाज झाल्याने 400 आकडा पार होऊ शकला नाही, अन्यथा आणखी एक 400 चा आकडा याच वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पार झाला असता.
4,4,6 by Buttler to Coetzee in last over.
— Johns. (@CricCrazyJohns) October 21, 2023
Coetzee gets Buttler in next over.
Coetzee had the last laugh.....!!!! pic.twitter.com/VnjbgYVYMn
यापूर्वी त्यांनी श्रीलंकेविरुद्ध 428 धावांचा डोंगर उभा केला होता. ही वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यामुळे आज दक्षिण आफ्रिकेकडून सहाव्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या वर्ल्डकपच्या इतिहासातील उभारली गेली.
ENGLANG 68 FOR 6 WHILE CHASING 400........!!!!!!! pic.twitter.com/gaFj8f3nlQ
— Johns. (@CricCrazyJohns) October 21, 2023
चालू स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं शेवटच्या दहा षटकांमध्येच धावांचा पाऊस पाडून सामना फिरवण्याचा पराक्रम केला आहे श्रीलंकेविरुद्ध त्यांनी शेवटच्या 10 षटकात 137 धावा कुटल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी शेवटच्या 10 षटकात एकूण 79 धावा केल्या होत्या, तर आज हे दोन्ही पराक्रम मोडीत काढत 143 धावा त्यांनी इंग्लंडविरुद्ध कुटल्या. त्यामुळे त्यांचा धावांचा डोंगर उभारला गेला.