एक्स्प्लोर

इंग्लंडविरुद्ध दुसरी T20, आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक

नागपूर : कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियासाठी इंग्लंडविरुद्धचा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना हा अतिशय प्रतिष्ठेचा बनला आहे. नागपूरच्या नव्या व्हीसीए स्टेडियमवरचा हा सामना गमावला, तर भारतीय संघावर गेल्या पंधरा महिन्यांमध्ये पहिल्यांदाच मायदेशातली एखादी मालिका गमावण्याची वेळ येईल. याआधी ऑक्टोबर 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारत दौऱ्यातली वन डे सामन्यांची मालिका 3-2 अशी जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. इयॉन मॉर्गनच्या इंग्लंडनं तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला होता. त्यामुळे नागपूरचा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना जिंकून मालिकेतलं आव्हान कायम राखण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यासाठी आपल्या संघबांधणीचा आणि रणनीतीचा नव्यानं विचार करावा लागेल, असं जाणकाराचं मत आहे. कानपूरच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी भारताच्या रथीमहारथीच्या बॅटला वेसण घालण्यात यश मिळवलं होतं. त्यामुळे विराट कोहलीला युवराज सिंगच्या फलंदाजीचा क्रमांक, मनीष पांडेचा सहावा क्रमांक आणि लोकेश राहुलचा फॉर्म या तीन बाबींचा प्रामुख्यानं पुनर्विचार करावा लागेल. कानपूरच्या सामन्यात यजुर्वेंद्र चहलच्या लेग स्पिनसमोर इंग्लंडच्या फलंदाजांची पंचाईत झाली. पण इंग्लंडच्या फलंदाजांना रोखण्यासाठी चहल आणि भारतीय गोलंदाजांच्या पाठीशी पुरेशा धावांचं संरक्षण नव्हतं. त्यामुळे नागपूरचा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना जिंकण्यासाठी भारतीय फलंदाजांना आपल्या कामगिरीत मोठी सुधारणा करावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Jadeja News : रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
Ranji Trophy 2026-27 : रिंकूने शतक ठोकलं, शमीने फलंदाजांना धडकी भरवली; रणजीत टीम इंडियाच्या खेळाडूंचा जलवा, राहुल-जैस्वाल मात्र फेल
रिंकूने शतक ठोकलं, शमीने फलंदाजांना धडकी भरवली; रणजीत टीम इंडियाच्या खेळाडूंचा जलवा, राहुल-जैस्वाल मात्र फेल
Team India Squad World Cup 2027 : 10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश
10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश
Virat Kohli Test Retirement : विराटला निवृत्तीसाठी भाग पाडलं... अजित आगरकरांवर गंभीर आरोप, माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं काय म्हणाला?
विराटला निवृत्तीसाठी भाग पाडलं... अजित आगरकरांवर गंभीर आरोप, माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
Pune MPSC Protest: MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Rohit Pawar and Devendra Fadnavis: रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune: MPSC च्या आंदोलनस्थळी येताच विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
MPSC च्या आंदोलनस्थळी येताच घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
Embed widget