'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
जेव्हा तुम्ही एका माणसाला मूळ मुद्द्यांपेक्षा, संस्थांपेक्षा आणि संविधानापेक्षा मोठं बनवता, तेव्हा तो माणूस देशाचं वाटोळंच करणार, त्यामुळे मला कोणीही हिरो बनवणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Abhijeet Dipke: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आहे, पण त्यासाठी मला हिरो बनवू नका. ही चूक करू नका. ही चूक अजिबात करू नका. एकाच माणसाला हिरो बनवण्याच्या सवयीमुळेच देशाचं वाटोळं झालं आहे. तुम्ही एका माणसाला संविधानापेक्षा मोठं बनवून टाकलं, सर्व संस्थांपेक्षा मोठं बनवलं, प्रत्येक गोष्टीपेक्षा मोठं बनवून टाकलं. जेव्हा तुम्ही एका माणसाला मूळ मुद्द्यांपेक्षा, संस्थांपेक्षा आणि संविधानापेक्षा मोठं बनवता, तेव्हा तो माणूस देशाचं वाटोळंच करणार, त्यामुळे मला कोणीही हिरो बनवणार नाही, अशी संयत प्रतिक्रिया काॅकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी दिली आहे.
#WATCH | Delhi: On the resignation of Union Education Minister Dharmendra Pradhan, Abhijeet Dipke, Founding President of Cockroach Janta Party, says, "I want to say something very important. Don't make me a hero because Dharmendra Pradhan resigned today. Don't make this mistake.… pic.twitter.com/ypODEXXUTS
— ANI (@ANI) July 25, 2026
तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील
अभिजित दिपके म्हणाले की, या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आम्ही करून दाखवलं. जर सरकारसमोर झुकला नाही, तर आपण भल्याभल्यांचे राजीनामे घेऊ शकतो. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, अशाही भावना दिपके यांनी व्यक्त केली. दीपके म्हणाले की, "मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे, पण आमच्या अजून दोन मागण्या आहेत. आम्ही असे जाणार नाही. एकदा झुरळ आत शिरले की ते बाहेर जाऊ शकत नाही. आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. त्यांनी सांगितले की, पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की ते एका झुरळाशी पंगा घेत आहेत. आम्ही एका मंत्र्याचा राजीनामा घेतला, तर तुम्ही कोण आहात? विद्यार्थ्यांवरील खटले मागे घेतले पाहिजेत. भाऊ, ही लोकशाही आहे. महिनाभर लोक मला विचारत आहेत की तुम्ही काय करत आहात? अजून किती काळ स्वस्थ बसणार? ते राजीनामा देणार नाहीत. हे एक मनमानी सरकार आहे. पण आम्ही ते करून दाखवले."
इतर महत्वाच्या बातम्या






















