(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shubman Gill : शुभमन गिलचा फ्लाॅप शो सुरुच, टी-20 अन् कसोटीमध्येही गंडला; राहिलो फक्त केवळ वनडेसाठी अशी स्थिती!
शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा निराशा केली. त्याने 12 चेंडूत 2 धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान तो संघर्ष करताना दिसला. त्याचवेळी सेंच्युरियनच्या उसळी चेंडूचा सामना त्याला करता आला नाही.
Shubman Gill vs South Africa 2023 1st Test Boxing Day : शुबमन गिलची बॅट कसोटी क्रिकेटमध्ये सतत फ्लॉप ठरत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेंच्युरियनमध्ये 26 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. टीम इंडियाने 24 धावांत रोहित शर्मा (5), यशस्वी जैस्वाल (17), शुभमन गिल (2) यांच्या विकेट्स गमावल्या.
कसोटी आणि टी-20 मध्ये गिलकडून निराशा
शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा निराशा केली. त्याने 12 चेंडूत 2 धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान तो संघर्ष करताना दिसला. त्याचवेळी सेंच्युरियनच्या उसळी चेंडूचा सामना त्याला करता आला नाही. यंदाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात खुद्द शुभमनने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा करून तिसर्या क्रमांकावर आपली फलंदाजी खुली केली. त्यानंतरही या फॉरमॅटमध्ये त्याच्या कामगिरीत सुधारणा झालेली नाही. गिल पुन्हा एकदा आफ्रिकेविरुद्ध फ्लॉप झाला आणि अवघ्या 2 धावा करून बाद झाला. गिलचा कसोटी क्रिकेटमधील फॉर्म आणि त्याच्या अलीकडच्या खेळींवर नजर टाकली, तर तो वाईट पद्धतीने संघर्ष करताना दिसला आहे. शुभमन गिलचे कसोटी क्रिकेटमधील शेवटचे शतक 9 मार्च 2023 रोजी अहमदाबाद येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाले; त्यानंतर त्याने 13, 18, 6, 10, 29 नाबाद आणि 2 धावांची खेळी खेळली.
टीम इंडियाच्या व्यवस्थापनाला गिलकडून मोठ्या अपेक्षा आहेत, त्याला नव्या पिढीचा फलंदाज म्हटले जाते. गिलने आतापर्यंत 18 सामन्यांत 32.20 च्या सरासरीने 966 धावा केल्या आहेत आणि 2 शतके आणि 4 अर्धशतके आहेत.
गिल केवळ एकदिवसीय खेळाडू राहिला?
शुभमन गिलच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्याची बॅट फक्त एकदिवसीय सामन्यांमध्येच चालते. गिलने आतापर्यंत 44 एकदिवसीय सामन्यांमध्ये 61.37 च्या सरासरीने आणि 103.46 च्या स्ट्राईक रेटने 2271 धावा केल्या आहेत. त्यात 6 शतकांचाही समावेश आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये गिलची कामगिरी समाधानकारक होती, येथे त्याने 9 सामन्यांमध्ये 44.25 च्या सरासरीने आणि 106.94 च्या स्ट्राइक रेटने 354 धावा केल्या.
टी-20 मध्ये गिलची अवस्था कसोटीसारखी
आतापर्यंत गिलने 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये गिलने 26.00 च्या सरासरीने आणि 145.11 च्या स्ट्राइक रेटने 312 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. म्हणजेच गिल कसोटीपाठोपाठ टी-20 मध्येही संघर्ष करताना दिसत आहे.
गिलला T20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळेल का?
अशा परिस्थितीत गिल ज्याप्रकारच्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे तो पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024मध्ये पोहोचू शकेल का, हा मोठा प्रश्न आहे. कारण नुकताच ऋतुराज गायकवाड हा टी-20 मध्ये त्यांचा प्रतिस्पर्धी म्हणून उदयास आला आहे. T-20 फॉरमॅटमध्ये सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्वालचाही पर्याय आहे.
इतर महत्वाच्या बातम्या