CWG 2022: जलतरण स्पर्धेत इतिहास रचण्यासाठी भारत सज्ज, श्रीहरी नटराजनकडून सुवर्णपदकाची अपेक्षा
Commonwealth Games 2022: इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे शुक्रवारपासून कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामाला सुरुवात झालीय.
Commonwealth Games 2022: इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे शुक्रवारपासून कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामाला सुरुवात झालीय. या स्पर्धेतील पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केलं. कॉमनवेल्थ स्पर्धेतील पहिल्या दिवशी भारताला पदक जिंकता आलं नाही. परंतु, भारतीय खेळाडूंनी धडाकेबाज कामगिरी करत पदकाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. बॅटमिंटन स्पर्धेत भारतानं पाकिस्तानला 5-0 असं पराभूत केलंय. याशिवाय, भारताचा जलतरणपटू श्रीहरी नजराजननं (Srihari Natarajan) उपांत्य फेरीत दम दाखवत अंतिम फेरीत धडक दिलीय. त्याच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात आहे.
बर्मिंगहॅममध्ये भारताचा तिरंगा फडकावण्याची संधी
महत्वाचं म्हणजे, कॉमनवेल्थ जलतरण स्पर्धेत भारताला आतापर्यंत एकच पदक जिंकता आलं आहे. याआधी भारताचा जलतरणपटू प्रशांत कर्माकरनं 2010 मध्ये पॅरा ऑलिम्पिक जलतरण स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक जिंकलं होतं. अशातच श्रीहरी नटराजनला आजच्या सामन्यात सुवर्णपदक जिंकून बर्मिंगहॅममध्ये भारताचा तिरंगा फडकावण्याची संधी उपलब्ध झालीय.
श्रीहरी नटराजनचा सामना कधी?
श्रीहरी नटराजननं पुरुषांच्या 100 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चमकदार कामगिरी करत 54.55 सेकंदाची वेळ नोंदवत चौथे स्थान पटकावलं. अशा प्रकारे श्रीहरी नटराजन स्पर्धेत एकूण 7 व्या स्थानावर राहिला आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. त्याचा अंतिम सामना आज दुपारी 1.35 मि. सुरु होणार आहे. मूळचा बंगळुरूचा असलेला श्रीहरीनं 54.68 सेकंदाची वेळ नोंदवून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला होता. त्यानं त्या स्पर्धेत तिसरे स्थान पटकावलं, तर एकूण पाचवा जलतरणपटू ठरला होता.
कुशाग्र आणि साजन यांना अजूनही पदकाची संधी
श्रीहरी व्यतिरिक्त साजन प्रकाश आणि कुशाग्र रावत हे देखील राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाले होते. कुशाग्र प्रथमच राष्ट्रकुलमध्ये सहभागी झाले होते. मात्र या दोघांनाही उपांत्य फेरीत स्थान मिळवता आलं नाही. पहिल्यांदाच कॉमनवेल्थ स्पर्धा खेळणाऱ्या कुशाग्रनं पुरूषांच्या 400 मीटर फ्रीस्टाइट मध्ये 3:57:45 सेकंदाची वेळ नोंदवून आपल्या हीटमध्ये अखेरच्या स्थानावर राहिला. तर, साजननं पुरुषांच्या 50 मीटर बटरफ्लायमध्ये 25.01 सेकंदाची वेळ नोंदवली आणि हीट्समध्ये 8व्या स्थानावर राहिला.
हे देखील वाचा-
- Rohit Sharma Record : जागतिक क्रिकेटमध्ये रोहितचाच डंका, हिटमॅनच्या नावे आणखी एक रेकॉर्ड
- RIL IOA Partnership : रिलायन्सची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनसोबत भागिदारी, 2024 ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच 'इंडिया हाऊस'
- CWG 2022 Day 1 Round Up : पहिला दिवस भारतासाठी ठरला दमदार! बॅडमिंटन, बॉक्सिंगमध्ये पाकिस्तानवर विजय, हॉकीमध्येही VICTORY