![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PV Sindhu, CWG 2022: सुवर्ण सिंधू! कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध एकतर्फी विजय, भारताची पदकसंख्या 56 वर
Birmingham 2022 Commonwealth Games: कॉमनवेल्थ स्पर्धेतील हे भारताचं 19 वं सुवर्णपदक आहे.
![PV Sindhu, CWG 2022: सुवर्ण सिंधू! कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध एकतर्फी विजय, भारताची पदकसंख्या 56 वर CWG 2022: Indian badminton player PV Sindhu won Gold medal Against Michelle Li Birmingham 2022 Commonwealth Games PV Sindhu, CWG 2022: सुवर्ण सिंधू! कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध एकतर्फी विजय, भारताची पदकसंख्या 56 वर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/0f7ba619508249bdd3cb610b4fe322f11659949587_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Birmingham 2022 Commonwealth Games: कॉमनवेल्थ बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं (PV Sindhu) कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध (Michelle Li) विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत पीव्ही सिंधूनं मिशेल लीविरुद्ध 21-15, 21-13 असा विजय मिळवत भारताच्या झोळीत आणखी एक सुवर्णपदक घातलंय. कॉमनवेल्थ स्पर्धेतील हे भारताचं 19 वं सुवर्णपदक आहे. तर, भारतानं आतापर्यंत या स्पर्धेत एकूण 56 पदकं जिंकली आहेत. ज्यात 15 रौप्यपदक आणि 22 कांस्यपदकांचा समावेश आहे.
कॉमनवेल्थ बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच पीव्ही सिंधूनं आक्रमक खेळी दाखवली. पहिल्या सेटमध्ये पीव्ही सिंधूनं 21-15 असा विजय मिळवत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही पीव्ही सिंधूनं मिशेल लीला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. दुसरा सेटही पीव्ही सिंधूनं 21-13 च्या फरकानं जिंकून सामन्यात एकतर्फी विजय मिळवला.
ट्वीट-
भारतासाठी पदक जिंकलेले खेळाडू
सुवर्णपदक- 19
मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना पटेल, नीतू घणघस, अमित पंघाल, एल्डहॉस पॉल, निकहत जरीन, शरथ-श्रीजा, पीव्ही सिंधू.
रौप्यपदक- 15
संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियंका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर, शरथ-साथियान, महिला क्रिकेट संघ, सागर.
कांस्यपदक- 22
गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ , संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव-दीपिका, किदम्बी श्रीकांत, त्रिशा-गायत्री.
हे देखील वाचा-
- CWG 2022: सुवर्णपदक जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाची चिटिंग! भारताविरुद्ध मैदानात उतरवला कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू
- CWG 2022 Medal Tally: कॉमनवेल्थ पदकतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल, दहाव्या दिवशी 15 पदकं जिंकणाऱ्या भारताचा क्रमांक कितवा?
- Achievements@75 : भारत आणि ऑलिम्पिक, स्वांतत्र्यापूर्वीपासून ऑलिम्पिक खेळणाऱ्या भारताचा इतिहास आहे तरी कसा?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)