CWG 2022: सुवर्णपदक जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाची चिटिंग! भारताविरुद्ध मैदानात उतरवला कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू
IND W vs AUS W, CWG 2022: भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया (IND W vs AUS W) यांच्यात रविवारी कॉमनवेल्थ स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला गेला.
![CWG 2022: सुवर्णपदक जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाची चिटिंग! भारताविरुद्ध मैदानात उतरवला कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू Australia's Tahlia McGrath allowed to play CWG 2022 gold medal T20 match against India despite being Covid-19 positive CWG 2022: सुवर्णपदक जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाची चिटिंग! भारताविरुद्ध मैदानात उतरवला कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/68e64004e54684b3564a15485c563fb71659945490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND W vs AUS W, CWG 2022: भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया (IND W vs AUS W) यांच्यात रविवारी कॉमनवेल्थ स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला गेला. ऑस्ट्रेलियाच्या संघानं हा सामना 9 धावांनी जिंकत सुवर्णपदक पटकावलं. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरनं एकाकी झुंज दिली. परंतु, भारताला विजय मिळवून देण्यात ती अपयशी ठरली. महत्वाचं म्हणजे, या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियानं घेतलेल्या निर्णयानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. ऑलराऊंडर ताहलिया मॅकग्राची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतरही ऑस्ट्रेलियानं क्रिकेटनं तिला अंतिम सामन्यात खेळण्याची परवागनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वीच ताहलिया मॅकग्राची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. परंतु, ऑस्ट्रेलिया क्रिकेटनं आयसीसीला तिच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याची माहिती दिली. त्यानंतर कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशेन आरएसीईजीनं तिला अंतिम सामन्यात खेळण्याची परवानगी दिली. ऑस्ट्रेलियाच्या संघाला कोणत्याही परस्थितीत सुवर्णपदक गमवायचं नव्हतं, असं यातून स्पष्ट होत आहे. ज्यामुळं त्यांनी एका पॉझिटिव्ह खेळाडूचा संघात समावेश करून सर्वांसाठी धोका पत्कारला.
ताहलिया मॅकग्राची निराशाजनक कामगिरी
भारताविरुद्ध ताहलिया मॅकग्राला काही खास कामगिरी करता आली नाही. या सामन्यात 4 चेंडूत फक्त दोन धावा करत मॅकग्रा माघारी परतली. एवढच नव्हे तर, गोलंदाजीतही तिला कमाल दाखवता आली नाही. तिनं दोन षटकात 24 धावा खर्च केल्या. तसेच तिला एकही विकेट मिळाली नाही.
भारताचं सुवर्णपदक हुकलं
ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 162 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाची सुरुवात खराब झाली. भारतानं 2.4 षटकात 22 धावांवर स्मृती मानधना आणि शेफाली वर्माच्या रुपात दोन विकेट्स गमावल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिना रॉड्रिगुएजनं भारताचा स्कोर 118 धावांवर पोहचवला. परंतु, मेगन शूटच्या गोलंदाजीवर जेमिमा बाद झाली. त्यानंतर सलग विकेट्स गमावणं सुरुच ठेवलं. दबावाखाली अनावश्यक शॉट खेळून हरमनप्रीत कौरही बाद झाली. या सामन्यात भारतीय महिला संघानं गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं. परंतु शेवटच्या षटकात फलंदाजांनी निशाजनक कामगिरी केली. या सामन्यात भारतीय संघ दबावाखाली खेळताना दिसला. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ सामन्यात पिछाडीवर असूनही शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी झुंज दिली. याचं यशही त्यांना मिळालं. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं सुवर्णपदकावर नाव कोरलंय.
हे देखील वाचा-
- CWG 2022 Medal Tally: कॉमनवेल्थ पदकतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल, दहाव्या दिवशी 15 पदकं जिंकणाऱ्या भारताचा क्रमांक कितवा?
- Achievements@75 : भारत आणि ऑलिम्पिक, स्वांतत्र्यापूर्वीपासून ऑलिम्पिक खेळणाऱ्या भारताचा इतिहास आहे तरी कसा?
- Commonwealth Games 2022 : भारताच्या खात्यात आतापर्यंत 55 पदकं; कोणत्या खेळाडूनं कोणतं पदक जिंकलं? पाहा संपूर्ण यादी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)