एक्स्प्लोर

IND vs PAK, CWG 2022: भारताचा पाकिस्तानवर 8 विकेट्सनं विजय, वाचा सामन्यातील 10 महत्वाचे मुद्दे

Commonwealth Games 2022: या पराभवसह पाकिस्तानचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय.

Commonwealth Games 2022: भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana) झुंजार अर्धशतकाच्या (42 चेंडूत 63 धावा) जोरावर भारतानं पाकिस्तानचा 8 विकेट्सनं (India Beats Pakisthan) पराभव केलाय. या पराभवसह पाकिस्तानचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या संघानं गुडघे टेकले. पावसामुळं या सामन्यातील दोन षटक कमी करण्यात आले. पाकिस्तानला 18 षटकात 99 धावापर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात भारतानं 11.4 षटकात आणि 8 विकेट्स राखून पाकिस्ताननं दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं.

भारत-पाकिस्तान सामन्यातील 10 महत्वाचे मुद्दे-

- नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या संघानं भारताला प्रथम गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं.

- भारताच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानचा संघ डगमगताना दिसला.

- पाकिस्तानकडून सलामीवीर मुनिबा अलीनं सर्वाधिक 32 धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानच्या कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा आकडा गाठता आला नाही.

- पावसामुळं 18 षटकाचा खेळण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्तानं भारतासमोर सर्वबाद 100 धावांचं लक्ष्य ठेवलं.

- भारताकडून स्नेह राणा, राधा यादव यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर, रेणुका सिंह आणि मेघना सिंह यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली.

- पाकिस्तानच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय महिला संघाची चांगली सुरुवात झाली. 

- सलामीवीर स्मृती मानधना (नाबाद 63) आणि शेफाली वर्मानं (16 धावा) सुरुवातीपासून आक्रमक खेळी केली. 

- दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागेदारी झाली. त्यानंतर सहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर शेफाली आऊट झाली.

- मात्र, स्मृतीनं दुसऱ्या बाजूनं आक्रमक खेळी सुरु ठेवत भारताला विजय मिळवून दिला. 

- पाकिस्तानकडून तुबा हसन आणि ओमैमा सोहेल यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
Ind vs Sl 1st Test : पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
WTC Points Table : श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
IND vs SL 1st Test : लंकेत टीम इंडियाचे शक्तीप्रदर्शन! पहिल्या कसोटीत घरात घुसून 165 धावांनी श्रीलंकेचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी
लंकेत टीम इंडियाचे शक्तीप्रदर्शन! पहिल्या कसोटीत घरात घुसून 165 धावांनी श्रीलंकेचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget