एक्स्प्लोर

CWG 2022: भारताच्या खात्यात आतापर्यंत 40 पदकं; कोणत्या खेळाडूनं कोणतं पदक जिंकलं? पाहा संपूर्ण यादी

CWG 2022 India Medal Winners: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामात (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत एकून 40 पदकांची कमाई केलीय.

CWG 2022 India Medal Winners: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामात (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत एकून 40 पदकांची कमाई केलीय. ज्यात 13 सुवर्ण, 11 रौप्य आणि 16 कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताला सर्वाधिक पदक कुस्तीमध्ये मिळाली आहेत. भारताला कुस्तीमध्ये एकूण 12 पदकं मिळाली आहेत. वे कुस्तीच्या विविध प्रकारात सहभागी झालेल्या सर्व भारतीय कुस्तीपटूंनी पदकं जिंकली आहेत.  त्यानंतर वेटलिफ्टिंगमध्येही भारतानं 10 पदकं  जिकंली आहेत. दरम्यान, भारतासाठी पदकं जिंकणाऱ्या खेळाडूंचं नाव जाणून घेतोय. 

राष्ट्रकुल स्पर्धेचा दुसरा दिवस

1) संकेत महादेव सरगर 
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत सांगलीच्या संकते महादेव सरगरनं भारताला सर्वात पहिले पदक मिळवून दिलं.  या स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी त्यानं वेटलिफ्टिंग पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात स्नॅचमध्ये 113 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 135 किलो म्हणजे एकूण 248 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकलं

2) गुरुराज पुजारी
 वेटलिफ्टर गुरुराजा पुजारीने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला दुसरं पदक मिळवून दिलं. त्यानं वेटलिफ्टिंग पुरुषांच्या 61 किलो वजनी गटात 269 किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकलं. 

3) मीराबाई चानू
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानू भारताला तिसरं पदक जिंकून देणारी वेटलिफ्टर ठरली. तिनं महिला वेटलिफ्टिंग 49 किलो गटात एकूण 201 किलो वजन उचलून देशासाठी सुवर्णपदक जिंकले. मीराबाईनं स्नॅचमध्ये 88 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचललं.

4) बिंद्याराणी देवी 
वेटलिफ्टर बिंदियारानी देवीनं महिलांच्या 55 किलो वजनी गटात भारतासाठी रौप्यपदक जिंकलंय.  तिनं स्नॅचमध्ये 86 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 116 किलो म्हणजे एकूण 202 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकलं. फक्त एका किलोन तिचं सुवर्णपदक हुकलं.

राष्ट्रकुल स्पर्धेचा तिसरा दिवस

5) जेरेमी लालरिनुंगा
जेरेमी लालरिनुंगा याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला दुसरं सुवर्णपदक जिंकून दिलं. त्यानं वेटलिफ्टिंगच्या पुरूष 67 किलो गटात 300 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकलं. रौप्यपदक विजेत्या वायपावा लोन (293 किलो) पेक्षा सात किलो जास्त वजन उचलून तो चॅम्पियन बनला.

6) अचिंता शेउली
अचिंता शेउलीनं पुरुषांच्या 73 किलो वजनी गटात स्नॅच फेरीत 143 किलो आणि क्लीन अँड जर्क फेरीत 170 किलो वजन उचललं. अशाप्रकारे त्यानं एकूण 313 किलो वजन उचललं आणि भारताच्या खात्यात तिसरं सुवर्णपदक जमा केलं.

राष्ट्रकुल स्पर्धेचा चौथा दिवस

7) सुशीला देवी
सुशीला देवी लिकमाबमनं ज्युदोच्या 48 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं. अंतिम फेरीत सुशीलाचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या मायकेला व्हिटबोईशी झाला, ज्यात सुशीला देवीनं विजय मिळवला.

8) विजय कुमार यादव
ज्युदोमध्ये विजय कुमार यादवनं भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. वेटलिफ्टिंगमध्ये पुरुषांच्या 60 किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या जोशुआकडून त्याला पराभव पत्करावा लागला. यानंतर त्याला रेपेचेज सामन्यांमध्ये संधी मिळाली आणि येथे त्यानं कांस्यपदक जिंकले. कांस्यपदकाच्या लढतीत विजयनं सायप्रसच्या प्राटोचा 10-0 असा पराभव केला.

9) हरजिंदर कौर
भारताची वेटलिफ्टर हरजिंदर कौरने महिलांच्या 71 किलो वजनी गटात एकूण 212 किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकलं. हरजिंदरनं स्नॅचमध्ये 93 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 119 किलो वजन उचललं.

राष्ट्रकुल स्पर्धेचा पाचवा दिवस

10) महिला लॉन बॉल्स संघ
लॉन बॉलच्या महिलांच्या चार स्पर्धेत भारतीय संघानं प्रथमच सुवर्णपदक जिंकलंय. लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया, रूपा राणी यांनी भारताला हं पदक मिळवून दिलंय. अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 17-10 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं.

11) पुरुष टेबल टेनिस संघ
पुरुषांच्या टेबल टेनिस संघाच्या अंतिम सामन्यात भारतानं सिंगापूरचा 3-1 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. शरद कमल, जी साथियान आणि हरमीत देसाई या त्रिकुटानं भारताला हे सुवर्ण मिळवून दिलं. येथे शरद कमलनं त्यांचा एकेरी सामना गमावला. परंतु साथियान आणि हरमीत यांनी आपापल्या एकेरी सामना आणि दुहेरीचा सामना जिंकून भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.

12) विकास ठाकूर
वेटलिफ्टर विकास ठाकूरनं वेटलिफ्टिंगच्या पुरुष 96 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकलं. विकासनं स्नॅचमध्ये 155 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 191 किलो वजन उचललं. त्यानं एकूण 346 किलो वजनासह दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

13) मिश्र बॅडमिंटन संघ
मिश्र बॅडमिंटन सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला मलेशियाकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला आणि रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा पराभव झाला. यानंतर ट्रीजा जॉली आणि गायत्री गोपीचंद या महिला जोडीचाही पराभव झाला. किदाम्बी श्रीकांतलाही पराभवाला सामोरे जावे लागले. एकेरी सामन्यात पीव्ही सिंधूनं तिचा सामना जिंकलाय.

राष्ट्रकुल स्पर्धेचा सहावा दिवस

14) लवप्रीत सिंह
वेटलिफ्टिंगच्या पुरूष 109 किलो ग्राम वजनी गटात भारताच्या लवप्रीत सिंहनं देशासाठी कांस्यपदक जिंकलंय. लवप्रीत सिंहनं स्नॅचमध्ये 163 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 192 किलो असं एकूण 355 किलो वजन उचलून कांस्यपदकावर कब्जा केला.

15) सौरव घोषाल
भारताचा दिग्गज खेळाडू सौरव घोषालनं स्क्वॉशमध्ये कांस्यपदक पटकावलं आहे. कांस्यपदकाच्या लढतीत त्यानं इंग्लंडच्या  जेम्स विल्स्ट्रॉपचा 3-0 असा पराभव केलाय.

16) तुलिका मान
तुलिका मानने ज्युदोमध्ये रौप्य पदक जिंकले. 78 किलो वजनी गटात त्याने हे पदक जिंकले.

17) गुरदीप सिंह
गुरदीप सिंहनं 109 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं. त्यानं एकूण 390 किलो वजन उचललं. वेटलिफ्टिंगमधील भारताचं हे 10 वं पदक आहे.

18) तेजस्वीन शंकर
भारतीय खेळाडू तेजस्वीन शंकरनं कांस्यपदक जिंकलं. त्याने लांब उडीत भारताला हे कांस्यपदक मिळवून दिलं.

राष्ट्रकुल स्पर्धेचा सातवा दिवस

19) मुरली श्रीशंकर
भारताच्या लांब उडीपटू मुरली श्रीशंकरनं भारतासाठी रौप्यपदक जिंकलं. त्यानं पुरुषांच्या लांब उडीच्या अंतिम फेरीत 8.08 मीटरच्या सर्वोत्तम उडीसह रौप्य पदकावर कब्जा केलाय. या पदकासह श्रीशंकर कॉमनवेल्थ स्पर्धेच्या इतिहासातील लांब उडी स्पर्धेत भारतासाठी रौप्य पदक जिंकणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला.

20) सुधीर
सुधीरने पॅरापॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या हेवीवेट प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. राष्ट्रकुल स्पर्धेत या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. सुधीरनं 212 किलो वजन उचललं आणि विक्रमी 134.5 गुणांसह सुवर्णपदक जिंकलं.

राष्ट्रकुल स्पर्धेचा आठवा दिवस

21) अंशू मलिक
अंशू मलिकनं आपल्या पहिल्याच कॉमनवेल्थ स्पर्धेत मोठी कामगिरी केलीय. तिनं कुस्तीमध्ये महिलांच्या 57 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकलं. ती सुवर्णाची दावेदार होती. परंतु, अंतिम फेरीत तिला नायजेरियाच्या ओडुनायो फोलासेडकडून 7-4 नं पराभव स्वीकारावा लागला.

22) बजरंग पुनिया
टोकियो ऑलिम्पिकचा कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया कुस्तीच्या ६५ किलो गटात चॅम्पियन ठरला. त्याने अंतिम फेरीत कॅनडाच्या लचलान मॅकनीलचा 9-2 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

23) साक्षी मलिक
साक्षी मलिकनं महिलांच्या 62 किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकलं. तिनं अंतिम फेरीत कॅनडाच्या अना गोंडिनेझ गोन्झालेसचा पराभव केला. या सामन्यात साक्षी 4-0 नं पिछाडीवर होती. पण त्यानंतर तिनं जोरदार कमबॅक करत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केलं. 

24) दीपक पुनिया
दीपक पुनियानं पुरुषांच्या 86 किलो फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. अंतिम सामन्यात त्यानं पाकिस्तानच्या मोहम्मद इनामचा 3-0 असा पराभव केला.

25) दिव्या काकरनं
फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये दिव्या काकरननं महिलांच्या 68 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलंय. तिला उपांत्यपूर्व फेरीत नायजेरियाच्या कुस्तीपटूनं एकतर्फी पराभूत केलं. त्यानंतर  दिव्या काकरला अंतिम फेरीत पोहोचताना दिव्याला रेपेचेजमध्ये संधी मिळाली आणि येथे तिने कॅमेरूनच्या ब्लेंडिन एनगिरीचा पराभव करून कांस्यपदक जिंकले.

26) मोहित ग्रेवाल
भारतीय कुस्तीपटू मोहित ग्रेवालने 125 किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्तीमध्ये उपांत्य फेरीतील सामना हरल्यानंतर कांस्यपदक जिंकलं. त्यानं जमैकाच्या आरोन जॉन्सनचा 6-0 असा पराभव करून कांस्यपदक जिंकलं.

राष्ट्रकुल स्पर्धेचा नववा दिवस

27) प्रियांका गोस्वामी
भारताच्या प्रियांकानं महिलांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. तिनं येथे वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना 43 मिनिटे 38.83 सेकंद अशी वेळ नोंदवली.

28) अविनाश मुकुंद साबळे
पुरुषांच्या 3000 स्टीपलचेसमध्ये भारताच्या अविनाश मुकुंद साबळेनं 8 मिनिट 11.20 सेकंदांसह वैयक्तिक सर्वोत्तम 8 मिनिट 11.20 सेकंदांसह रौप्यपदकावर कब्जा केलाय.

29) पुरुष लॉन बॉल्ससंघ
लॉन बॉल्स पुरुष संघाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला उत्तर आयर्लंडकडून 5-18 असा पराभव पत्करावा लागला आणि त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. मात्र, कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासातील लॉन बॉलमध्ये पुरुषांचं हे पहिलंच पदक आहे.

30) जास्मिन
बॉक्सिंगमध्ये महिलांच्या लाइटवेट (57-60 किलो) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय बॉक्सर जस्मिनला इंग्लंडच्या जेमा पेज रिचर्डसनकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला आणि तिला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

31) पूजा गेहलोत
कुस्तीमध्ये पूजाला महिलांच्या 50 किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठता आली नाही. परंतु तिनं कांस्यपदकाच्या लढतीत स्कॉटलंडच्या क्रिस्टेल एलचा एकतर्फी पराभव केला. तिनं 12-2 अशा फरकानं विजय मिळवत कांस्यपदक जिंकलं.

32) रवी कुमार दहिया
टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता रवी कुमार दहियानं पुरुषांच्या 57 किलो वजनी गटातील कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकलं. त्यानं नायजेरियाच्या अबिकवेनिमो वेल्सेनचा 10-0 असा पराभव केलाय.

33) विनेश फोगट
विनेश फोगट महिलांच्या 53 किलो वजनी गटात कुस्तीमध्ये विजेती ठरली. त्याने अवघ्या काही सेकंदात श्रीलंकेच्या चामोदिया केशानीला हरवून सुवर्णपदक जिंकले.

34)  नवीन कुमार
कुस्तीपटू नवीन कुमारनंही भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं. त्यानं कुस्तीतील पुरुषांच्या 74 किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मोहम्मद शरीफ ताहिरचा 9-0 असा पराभव केलाय. 

35) पूजा सिहाग
कुस्तीमध्ये पूजा सिहागनं महिलांच्या 76 किलो गटात कांस्यपदक जिंकले. तिला अंतिम फेरीत स्थान मिळवता आलं नाही. पण सुवर्णपदकाच्या लढतीत तिनं ऑस्ट्रेलियाच्या नाओमी डी ब्रुइनचा 11-0 असा पराभव करून कांस्यपदक जिंकलं.

36) मोहम्मद हुसामुद्दीन
पुरुष बॉक्सिंगच्या 57 किलो गटात भारतीय बॉक्सर हुसामुद्दीनने कांस्यपदक मिळवले. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

37) दीपक नेहरा
पुरुषांच्या कुस्तीच्या 97 किलो वजनी गटात भारतीय कुस्तीपटू दीपक नेहराने पाकिस्तानच्या तयेब राजाला 10-2 असे पराभूत करून कांस्यपदक जिंकलं. 

38) सोनलबेन पटेल
पॅरा टेबल टेनिसच्या महिला एकेरीत 34 वर्षीय सोनलबेनने कांस्यपदक जिंकले. तिने इंग्लंडच्या स्यू बेलीचा 11-5, 11-2, 11-3 असा पराभव केला.

39) भावना पटेल
भाविना पटेलनं पॅरा टेबल टेनिसच्या महिला एकेरीच्या 3-5 गटात सुवर्णपदक पटकावलं. तिनं नायजेरियाच्या क्रिस्टियाना इक्पेओईचा 12-10, 11-2, 11-9 असा पराभव केला.

40) रोहित टोकस
भारताच्या रोहित टोकसला बॉक्सिंगमधील पुरुषांच्या 67 किलो वेल्टरवेट गटाच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. झांबियाच्या स्टीफन झिम्बाविरुद्ध त्याला पराभवाचा सामना करावा लागला. येथे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | एबीपी माझा 06 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024Manoj Jarange : मराठा - ओबीसींमध्ये Chhagan Bhujbal वाद लावतात, मनोज जरांगेंचा हल्लाबोलMumbai Rain Update | पुढील 3 तासांत मुंबईसह रायगड, रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाचा इशाराMaharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 08 Jully

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Pune Crime : प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये म्हणत तगादा; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचले
प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये म्हणत तगादा; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचले
Vijay Wadettiwar : इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
Pangong Lake in eastern Ladakh : लडाखजवळ चिनी सैन्याने गोळा केली शस्त्रास्त्रे; सॅटेलाईट फोटोंवरून उघड, बंकर सुद्धा बांधले
लडाखजवळ चिनी सैन्याने गोळा केली शस्त्रास्त्रे; सॅटेलाईट फोटोंवरून उघड, बंकर सुद्धा बांधले
Embed widget