एक्स्प्लोर

CWG 2022: भारताची आतापर्यंत 18 पदकांची कमाई, कोणत्या खेळाडूनं कोणतं पदक जिंकलंय? पाहा संपूर्ण यादी

CWG 2022 India Medal Winners: इंग्लंडच्या बर्मिगहम येथे सुरु कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेच्या (Commonwealth Weightlifting Games 2022) सहाव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ दाखवत पाच पदकं खिशात घातली आहेत.

CWG 2022 India Medal Winners: इंग्लंडच्या बर्मिगहम येथे सुरु कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेच्या (Commonwealth Weightlifting Games 2022) पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ दाखवत पाच पदकं खिशात घातली आहेत. यामध्ये चार कांस्यपदक आणि एक रोप्यपदकाचा समावेश आहे. भारताचे वेटलिफ्टर दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. दरम्यान, सहाव्या दिवशी जिंकलेल्या पाच पदकांमुळं भारताची पदकसंख्या 18 वर पोहचलीय.

राष्ट्रकुल स्पर्धेचा दुसरा दिवस-

1) संकेत महादेव सरगर 
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत सांगलीच्या संकते महादेव सरगरनं भारताला सर्वात पहिले पदक मिळवून दिलं.  या स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी त्यानं वेटलिफ्टिंग पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात स्नॅचमध्ये 113 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 135 किलो म्हणजे एकूण 248 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकलं

2) गुरुराज पुजारी
 वेटलिफ्टर गुरुराजा पुजारीने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला दुसरं पदक मिळवून दिलं. त्यानं वेटलिफ्टिंग पुरुषांच्या 61 किलो वजनी गटात 269 किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकलं. 

3) मीराबाई चानू
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानू भारताला तिसरं पदक जिंकून देणारी वेटलिफ्टर ठरली. तिनं महिला वेटलिफ्टिंग 49 किलो गटात एकूण 201 किलो वजन उचलून देशासाठी सुवर्णपदक जिंकले. मीराबाईनं स्नॅचमध्ये 88 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचललं.

4) बिंद्याराणी देवी 
वेटलिफ्टर बिंदियारानी देवीनं महिलांच्या 55 ​​किलो वजनी गटात भारतासाठी रौप्यपदक जिंकलंय.  तिनं स्नॅचमध्ये 86 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 116 किलो म्हणजे एकूण 202 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकलं. फक्त एका किलोन तिचं सुवर्णपदक हुकलं.

राष्ट्रकुल स्पर्धेचा तिसरा दिवस-

5) जेरेमी लालरिनुंगा
जेरेमी लालरिनुंगा याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला दुसरं सुवर्णपदक जिंकून दिलं. त्यानं वेटलिफ्टिंगच्या पुरूष 67 किलो गटात 300 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकलं. रौप्यपदक विजेत्या वायपावा लोन (293 किलो) पेक्षा सात किलो जास्त वजन उचलून तो चॅम्पियन बनला.

6) अचिंता शेउली
अचिंता शेउलीनं पुरुषांच्या 73 किलो वजनी गटात स्नॅच फेरीत 143 किलो आणि क्लीन अँड जर्क फेरीत 170 किलो वजन उचललं. अशाप्रकारे त्यानं एकूण 313 किलो वजन उचललं आणि भारताच्या खात्यात तिसरं सुवर्णपदक जमा केलं.

राष्ट्रकुल स्पर्धेचा चौथा दिवस- 

7) सुशीला देवी
सुशीला देवी लिकमाबमनं ज्युदोच्या 48 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं. अंतिम फेरीत सुशीलाचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या मायकेला व्हिटबोईशी झाला, ज्यात सुशीला देवीनं विजय मिळवला.

8) विजय कुमार यादव
ज्युदोमध्ये विजय कुमार यादवनं भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. वेटलिफ्टिंगमध्ये पुरुषांच्या 60 किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या जोशुआकडून त्याला पराभव पत्करावा लागला. यानंतर त्याला रेपेचेज सामन्यांमध्ये संधी मिळाली आणि येथे त्यानं कांस्यपदक जिंकले. कांस्यपदकाच्या लढतीत विजयनं सायप्रसच्या प्राटोचा 10-0 असा पराभव केला.

9) हरजिंदर कौर
भारताची वेटलिफ्टर हरजिंदर कौरने महिलांच्या 71 किलो वजनी गटात एकूण 212 किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकलं. हरजिंदरनं स्नॅचमध्ये 93 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 119 किलो वजन उचललं.

राष्ट्रकुल स्पर्धेचा पाचवा दिवस- 

10) महिला लॉन बॉल्स संघ
लॉन बॉलच्या महिलांच्या चार स्पर्धेत भारतीय संघानं प्रथमच सुवर्णपदक जिंकलंय. लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया, रूपा राणी यांनी भारताला हं पदक मिळवून दिलंय. अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 17-10 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं.

11) पुरुष टेबल टेनिस संघ
पुरुषांच्या टेबल टेनिस संघाच्या अंतिम सामन्यात भारतानं सिंगापूरचा 3-1 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. शरद कमल, जी साथियान आणि हरमीत देसाई या त्रिकुटानं भारताला हे सुवर्ण मिळवून दिलं. येथे शरद कमलनं त्यांचा एकेरी सामना गमावला. परंतु साथियान आणि हरमीत यांनी आपापल्या एकेरी सामना आणि दुहेरीचा सामना जिंकून भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.

12) विकास ठाकूर
वेटलिफ्टर विकास ठाकूरनं वेटलिफ्टिंगच्या पुरुष 96 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकलं. विकासनं स्नॅचमध्ये 155 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 191 किलो वजन उचललं. त्यानं एकूण 346 किलो वजनासह दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

13) मिश्र बॅडमिंटन संघ
मिश्र बॅडमिंटन सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला मलेशियाकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला आणि रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा पराभव झाला. यानंतर ट्रीजा जॉली आणि गायत्री गोपीचंद या महिला जोडीचाही पराभव झाला. किदाम्बी श्रीकांतलाही पराभवाला सामोरे जावे लागले. एकेरी सामन्यात पीव्ही सिंधूनं तिचा सामना जिंकलाय.

राष्ट्रकुल स्पर्धेचा सहावा दिवस- 

14) लवप्रीत सिंह
वेटलिफ्टिंगच्या पुरूष 109 किलो ग्राम वजनी गटात भारताच्या लवप्रीत सिंहनं देशासाठी कांस्यपदक जिंकलंय. लवप्रीत सिंहनं स्नॅचमध्ये 163 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 192 किलो असं एकूण 355 किलो वजन उचलून कांस्यपदकावर कब्जा केला.

15) सौरव घोषाल
भारताचा दिग्गज खेळाडू सौरव घोषालनं स्क्वॉशमध्ये कांस्यपदक पटकावलं आहे. कांस्यपदकाच्या लढतीत त्यानं इंग्लंडच्या  जेम्स विल्स्ट्रॉपचा 3-0 असा पराभव केलाय.

16) तुलिका मान
तुलिका मानने ज्युदोमध्ये रौप्य पदक जिंकले. 78 किलो वजनी गटात त्याने हे पदक जिंकले.

17) गुरदीप सिंह
गुरदीप सिंहनं 109 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं. त्यानं एकूण 390 किलो वजन उचललं. वेटलिफ्टिंगमधील भारताचं हे 10 वं पदक आहे.

18) तेजस्वीन शंकर
भारतीय खेळाडू तेजस्वीन शंकरनं कांस्यपदक जिंकलं. त्याने लांब उडीत भारताला हे कांस्यपदक मिळवून दिलं.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Mhaske : ठाकरेंचे मुंबईतील आमदार पक्ष सोडणार? नरेश म्हस्केंचं खळबळजनक वक्तव्यRaj Thackeray On Marathi Manus : मराठी हल्ला केल्यास मराठी म्हणून अंगावर येईनDevendra Fadnavis Gadchiroli : गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विविध कामांच्या उद्धाटनCM Devendra Fadnavis Full Speech : उत्तर गडचिरोली नक्षलवाद मुक्त, फडणवीसांचं गडचिरोलीत भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अमेरिका हादरली,नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांना चारचाकी वाहनानं चिरडलं अन् गोळीबार,12 जणांचा मृत्यू 30 जखमी, दहशतवादी हल्ल्याचा दावा
अमेरिकेत नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांवर कार चढवली, अंदाधुंद गोळीबार,12 जणांचा मृत्यू,दहशतवादी हल्ल्याचा दावा
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
Embed widget