एक्स्प्लोर

मुंबई इंडियन्सकडून चेन्नईचा 10 विकेट्सनी धुव्वा; डीकॉक-किशनची अभेद्य सलामी, सातव्या विजयासह मुंबई गुणतालिकेत टॉपवर

CSK vs MI: मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 10 गडी राखून पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.या मोसमात मुंबई इंडियन्सकडून पहिल्यांदाच सलामीला आलेल्या ईशान किशनने 37 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या.

CSK vs MI : शारजाच्या मैदानात मुंबई इंडियन्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 10 विकेट्सनी धुव्वा उडवला. मुंबईचा यंदाच्या मोसमातला हा सातवा विजय ठरला. या सामन्यात चेन्नईनं मुंबईसमोर अवघं 114 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईच्या ईशान किशन आणि क्विंटन डी कॉक या जोडीनं अभेद्य सलामी देत हे आव्हान 13व्या षटकातच पार केलं. ईशान किशननं 37 चेंडूत नाबाद 68 तर डी कॉकनं नाबाद 46 धावा फटकावल्या.

चेन्नईच्या फलंदाजांचा फ्लॉप शो

त्याआधी मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर चेन्नईची आघाडीची फळी पत्त्याप्रमाणे कोसळली. पहिल्याच षटकात सलामीवीर ऋतुराज गायकवाड खाते न उघडताच बाद झाला. यानंतर अंबाती रायुडू संघाची धावसंख्या तीन असताना अवघ्या एका धावसंख्येवर माघारी परतला. त्याच्या पुढच्या बॉलवर नारायण जगदीसनही खाते न उघडताच तंबूत परतला. जसप्रीत बुमराहने सलग दोन चेंडूत या दोघांनाही बाद केले. तीन धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स पडल्यानंतर चेन्नईचा डाव पत्त्यांप्रमाणे कोसळू लागला. पुढच्याच षटकात शानदार फॉर्ममध्ये असलेला फाफ डू प्लेसिसही एका धावसंख्येवर बाद झाला. यानंतर रवींद्र जडेजाही 21 धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला. जडेजाने सहा चेंडूत सात धावा केल्या. निम्मा संघ 21 धावांमध्ये गारद झाल्यानंतर एमएस धोनीने आरामात खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो चहरच्या लेगस्पिनवर झेलबाद झाला. धोनीने 16 चेंडूत 16 धावा केल्या. यात त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला.

IPL 2020 : राजस्थान प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा मंदावल्या; पॉईंट टेबलची स्थिती काय?

चेन्नईची एकवेळ सहा बाद 30 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. पण सॅम करननं तळाच्या फलंदाजांच्या साथीनं चेन्नईचा डाव सावरला. करननं 47 चेंडूत 52 धावांची खेळी केली. करन आणि ताहीरनं नवव्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी रचली. आयपीएलच्या आजवरच्या इतिहासातली ही नवव्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली. या भागीदारीमुळे चेन्नईला 9 बाद 114 धावांची मजल मारता आली. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्टनं 18 धावात 4 फलंदाजांना माघारी धाडलं. तर बुमरा आणि राहुल चहरनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात मुंबईने अवघ्या 12.2 षटकांत एकही गडी न गमावता लक्ष्य सहज साध्य केलं. या मोसमात पहिल्यांदाच सलामीला आलेल्या मुंबईच्या इशान किशनने 37 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या. या खेळीत सहा चौकार आणि पाच षटकारांचा समावेश आहे. तर क्विंटन डिकॉकने 37 चेंडूत नाबाद 46 धावा फटकावल्या.

मुंबई गुणतालिकेत टॉपवर

मुंबईचा यंदाच्या मोसमातला हा 10 सामन्यातला सातवा विजय ठरला. त्यामुळे 14 गुणांसह मुंबईचा संघ आता टॉपवर पोहोचला आहे. मुंबईला आता बाद फेरी गाठण्यासाठी केवळ एका विजयाची आवश्यकता आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Wardha Crime : इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
Bachchu Kadu : दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
मदतफेरीतून जमवले 43 लाख; सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
मदतफेरीतून जमवले 43 लाख; सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Malvan Dolphin Fish Spot : मृत बाळाला वाचवताना डॉल्फिन आईची धडपड कॅमेऱ्यात कैदMurlidhar Mohol on Shirdi Airport : शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुरु होणारChandrashekhar Bawankule : Saamana तून फडणवीसांचे कौतुक;चंद्रशेखर बावनकुळेंनी मानले आभारBharat Gogawale : मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भरत गोगावलेंची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime : इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
Bachchu Kadu : दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
मदतफेरीतून जमवले 43 लाख; सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
मदतफेरीतून जमवले 43 लाख; सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'त्या' बहिणींना 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार, नेमका निकष काय?
लाडकी बहीण योजनेच्या जीआरमधील 'ती' महत्त्वाची अट, बहिणींना पडताळणीनंतर 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार
Bajrang Sonawane : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
आधी बीडच्या मोर्चात, पुन्हा मुख्यमत्र्यांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांचे खास आमदार मोठं बोलले
आधी बीडच्या मोर्चात, पुन्हा मुख्यमत्र्यांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांचे खास आमदार मोठं बोलले
NCP : राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा; शरद पवारांकडील आमदार, नेते येणार असतील तर आधी 'हे' करा
राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा; शरद पवारांकडील आमदार, नेते येणार असतील तर आधी 'हे' करा
Embed widget