एक्स्प्लोर

Pakistan Cricketer Brother Nadeer Khan: स्वत:च्या देशाने वाऱ्यावर सोडलं; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा भाऊ मुंबईत मदतीसाठी फिरतोय दारोदार! नेमकं काय प्रकरण?

Pakistan Cricketer Brother Nadeer Khan: व्हिसा संपल्यामुळे नेपाळ सरकारकडूनही हवी तशी मदत मिळत नसल्याने नादीर अनधिकृत रित्या भारतात आला. भारतात येऊन मुंबई पोलिसांना शरण गेला.

मुंबई: पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपट्टूचा भाऊ मुंबईत मदतीसाठी फिरतोय दारोदार... नादीर खान असे या व्यक्तीचे नाव असून तो पाकिस्तानचा माजी क्रिकेटपट्टू अन्वर खान याचा लहान भाऊ आहे. व्यवसायासाठी नेपाळला गेलेला नादिरची तेथील व्यावसायिकांनी फसवणूक केली. व्हिसा संपल्यामुळे नेपाळ सरकारकडूनही हवी तशी मदत मिळत नसल्याने नादीर अनधिकृत रित्या भारतात आला. भारतात येऊन मुंबई पोलिसांना शरण गेला. पोलिसांनी नादीरवर कायदेशीर कारवाई केली. मात्र त्याला पून्हा पाकिस्तानला पाठवण्यासाठी प्रयत्नही सुरू केलेत. मात्र पाकिस्तानी दूतवासाकडून अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याच्या प्रतिसादाची वाट बघत नादीर MRA (माता रमाबाई मार्ग पोलिस ठाणे)येथे दिवस काढत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपट्टू अन्वर खान यांनी १९७९ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचं प्रतिनिधीत्व केलं होतं. त्यावेळी त्या संघात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान याचाही समावेश होता. सध्या अन्वर खान हे अमेरीकेत कुटुंबासोबत स्थायिक झालेत तर त्यांचा लहानभाऊ नादीर हा भारतात मदतीसाठी दारोदार भटकत आहे.

मूळचा पाकिस्तानच्या कराचीमधील नाजिमाबादचे रहिवाशी असलेले नादीर खान हे उच्च शिक्षित आहेत. नादिर यांना दोन पत्नी आणि दोन मुलं असून ते पाकिस्तानमध्ये वास्तव्यास आहेत. व्यवसाय व शिक्षणासाठी ३९ देशांचा प्रवास त्यांनी केला आहे. खान  यांचाही कपड्याचा व्यवसाय असल्याने व्यवसायानिमित्तच ते नोव्हेंबर २०२१ मध्ये नेपाळला गेले. मात्र नेपाळमधील व्यावसायिकांनी त्यांची २ कोटींना फसवणूक केली. त्या विरोधात त्यांनी नेपाळच्या काठमांडू येथील पोलिसात दाद मागितली. मदत मिळेल या हेतूने नादिर यांनी नेपाळमध्येच २२ महिने वाट बघितली. तो पर्यंत नादिर यांचा व्हिसा संपला होता. नेपाळ सरकारने व्हिसा संपल्याची कारवाई केली नाही. मात्र नेपाळमध्ये जादा दिवस थांबल्या प्रकरणी प्रतिदिवसानुसार १ हजार डाॅलर दंड लावला. नादीरने व्यावसायिकांची डिसेंबर २०२३ मध्ये पोलिसात तक्रार दिल्याचे कळताच, त्या व्यावसायिकांनी नादीर यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली. या मारहाणीत त्या आरोपीनी नादीर यांचे एक बोटही मोडले. तर नादीर यांच्या जवळची सर्व मूळ कागदपत्रही जाळून नष्ठ केली

व्यवसायात झालेलं नुकसान, नेपाळी व्यावसायिकांनी केलेली मारहाण, कागदपत्र नष्ठ केल्यामुळे परतीचे दरवाजे बंद झाल्याने नादीर मानसिक तणावात होता. त्यावेळी भारतातून पाकिस्तानी दूतवासातून मदत मिळेल या हेतूने उत्तरप्रदेशच्या सोनौली मार्गे अनधिकृत रित्या भारतात आले. गोरखपूरहून थेट दिल्लीतील पाकिस्तान दूतवास गाठले. पाकिस्तानी दूतवासाने आवश्यकती कागदपत्रे मागीतली मात्र तिच कागदपत्रे नेपाळमध्ये त्या व्यावसायिकांनी नष्ट केली. तब्बल दोन दिवस पाकिस्तानी दूतवासाबाहेर नादीर हे मदतीसाठी तासोंतास थांबले. मात्र मदत मिळली नाही. भारतात खर्चासाठी त्यांनी त्यांचा एक मोबाइल विकला. त्यातून मिळालेल्या पैशातून जेवणं आणि मुंबईला मदत मिळेल या अनुशंगाने दिल्लीहून मुंबईला जाणार्या एक्सप्रेसची एजंटकडून तिकिटं घेतली. मात्र तिथेही एजंटने नादीर यांची फसवणूक करत त्यांना सूरत पर्यंतचं तिकिट दिलं

मुंबईत १ नोव्हेंबर २०२३ मध्ये आल्यानंतरही जाणार कुठे हा प्रश्न नादिरकडे होताच, गोव्यात अनेक पर्यटक येतात म्हणून दादरहून ते बिना तिकिट गोव्याला गेले. मात्र तिथेही परिस्थिती सारखीच आहे हे पाहून त्याच रात्री एक्सप्रेसने मुंबईला आले. मुंबईला येताच नादिर यांनी टॅक्सीने थेट पोलिस उपायुक्त १ कार्यालय गाठत पोलिसांना शरण गेले. त्यानंतर नादिरची NIA, RAW, IB, ATS  अशा सर्वच तपास यंत्रणानी संशयित म्हणन चौकशी केली. यात काही महिने गेल्यावर ११ एप्रिल २०२४ रोजी  MRA मार्ग पोलिसांनी नादिरवर गुन्हा दाखल केला. सुनावनी सुरू असेपर्यंत निदिरला आर्थररोड कारागृहाच ठेवले. ८ आॅकटोंबर २०२४ रोजी न्यायालयाने नादिरला ६ महिन्याची शिक्षा व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली

आर्थररोड कारागृहात इतर आरोपीसोबतचं राहणीमान, अपूर्ण झोप, परतीचे विचार या मानसिक तणावातून नादिरचे वजन १४ किलोंनी घटलं, पोलिसांच्या नजरकैदेत नादिर कायम असतो. वर्षभरापूर्वीच कुटुंबियांसोबत त्याने काय तो शेवटा संवाद साधला असेल, कुटुंबियांच्याच आठवणीने नादिर अधून मधून ढसा ढसा रडतो. वाढत्या वयामुळे मानसिक तणावातून दोनदा नादिरला त्रासही झाल्याचे पोलिस सांगतात

शिक्षा पूर्ण झाल्यानंतर मुंबईत डिटेशन सेंटर नसल्यामुळे नादिरचा ताबा पून्हा MRA पोलिसांना देण्यात आला. आता नादिरला पाकिस्तानला परत पाठवण्यासाठी  MRA कडून नवी दिल्लीत प्रयत्न सुरू करून ४ महिने उटले. पाकिस्तान दूतवासाशी संपर्क केला. या दोघांच्या उत्तराची वाट सध्या नादिर खान पहात आहेत.

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
आगामी निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात SIR पुढे ढकलावा; राज्य निवडणूक आयोगाची केंद्राकडे विनंती
आगामी निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात SIR पुढे ढकलावा; राज्य निवडणूक आयोगाची केंद्राकडे विनंती
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
राज ठाकरेंचा प्रश्न, राज्य निवडणूक आयुक्ताचं उत्तर; मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट हा आमचा विषय नाही
राज ठाकरेंचा प्रश्न, राज्य निवडणूक आयुक्ताचं उत्तर; मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट हा आमचा विषय नाही
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Metro Name Row : मेट्रो स्टेशनच्या नावावरून वाद, नेहरूंचं नाव वगळल्याचा आरोप Special Report
Voter List Row Zero Hour : मतदार यादीतील गोंधळावरून आरोप-प्रत्यारोप, आयोगावर प्रश्नांची सरबत्ती
Zero Hour : मतदार याद्यांवरून रणकंदन, शिष्टमंडळ आयोगाची पुन्हा भेट घेणार, कशी चर्चा होणार?
Zero Hour : शिष्टमंडळ भेटीच्या निमित्तानं मविआला 'राज ठाकरे' हा नवा चेहरा मिळालाय का?
Voter List Fraud Zero Hour : 'एकाच घरावर 150 मतदार', अजित नवलेंनी निवडणूक आयोगासमोर पुरावे मांडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
आगामी निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात SIR पुढे ढकलावा; राज्य निवडणूक आयोगाची केंद्राकडे विनंती
आगामी निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात SIR पुढे ढकलावा; राज्य निवडणूक आयोगाची केंद्राकडे विनंती
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
राज ठाकरेंचा प्रश्न, राज्य निवडणूक आयुक्ताचं उत्तर; मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट हा आमचा विषय नाही
राज ठाकरेंचा प्रश्न, राज्य निवडणूक आयुक्ताचं उत्तर; मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट हा आमचा विषय नाही
देशातील महत्त्वाच्या खासगी बँकची विक्री, आशियातील मोठी डील? आखाती भारतीयांना होणार फायदा
देशातील महत्त्वाच्या खासगी बँकची विक्री, आशियातील मोठी डील? आखाती भारतीयांना होणार फायदा
मनसेचा दीपोत्सव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन; ठाकरे बंधूंची दिवाळीही एकत्र
मनसेचा दीपोत्सव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन; ठाकरे बंधूंची दिवाळीही एकत्र
Digital Arrest : डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? पोलीस असं करू शकतात का? व्हिडीओ कॉल आला तर काय कराल? जाणून घ्या नव्या फ्रॉडबद्दल A To Z माहिती
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? पोलीस असं करू शकतात का? व्हिडीओ कॉल आला तर काय कराल? जाणून घ्या नव्या फ्रॉडबद्दल A To Z माहिती
पाल्याने शिक्षिकेला सर्वांसमोर मारावे ही पालकांची भूमिका; पुण्यातील विद्यार्थी मारहाणप्रकरणात ट्विस्ट, शाळेचं पत्र समोर
पाल्याने शिक्षिकेला सर्वांसमोर मारावे ही पालकांची भूमिका; पुण्यातील विद्यार्थी मारहाणप्रकरणात ट्विस्ट, शाळेचं पत्र समोर
Embed widget