एक्स्प्लोर
VIDEO : गौतम गंभीरची बॅटिंग, लेकीची बॉलिंग आणि...
गंभीरने आपल्या मोठ्या मुलीसोबत क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे
मुंबई : क्रिकेटपटू गौतम गंभीरने नुकतीच त्याची मुलगी आझीनच्या शाळेला भेट दिली. शाळेत वडील विरुद्ध मुलगी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी गौतम गंभीरने लेकिच्या गोलंदाजीला तोंड दिलं.
गंभीरने आपल्या मोठ्या मुलीसोबत क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. 'माझी मुलगी आझीनच्या शाळेत तिच्या गोलंदाजीला सामोरा गेलो. हे अत्यंत हाय प्रेशर काम होतं. तिलाही माहित आहे की लाईन ऑफ स्टम्पच्या बाहेर असायला हवी' असं गंभीरने व्हिडिओ ट्वीट करताना लिहिलं आहे.
https://twitter.com/GautamGambhir/status/927537893819797504
गौतमचं लग्न ऑक्टोबर 2011 मध्ये नताशा सोबत झालं. 1 मे 2014 रोजी त्याची मोठी मुलगी आझीनचा जन्म झाला होता. जुलै 2017 मध्ये त्याची धाकटी मुलगी अनैझाचा जन्म झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement