Yuzvendra Chahal : धक्कादायक! दारुच्या नशेत 'या' क्रिकेटरनं चहलसोबत केलं घृणास्पद कृत्य, कोण आहे ती व्यक्ती?
Yuzvendra Chahal Physical Assaulted : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलचे दोन क्रिकेटरनी शारीरिक शोषण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Yuzvendra Chahal Physical Harassment : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलचे दोन क्रिकेटरनी शारीरिक छळ केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दारुच्या नशेत मुंबई इंडियन्स संघाच्या दोन खेळाडूंनी युजवेंद्र चहलचे शारीरिक छळ केल्याचं समोर आल्यानं एकच खळबळ माजली आहे. शोषण करणारे दोघे क्रिकेटर जेम्स फ्रँकलिन (James Franklin) आणि अँड्र्यु सायमंड्स (Andrew Symonds) हे असल्याचा खुलासा चहलनं केला आहे. चहलसोबत घृषास्पद कृत्य करणारा जेम्स फ्रँकलिन आणि अँड्र्यु सायमंड्स कोण आहेत जाणून घ्या...
काय आहे नेमकं प्रकरण?
ही घटना 2011 साली घडली आहे. यावेळी मुंबई इंडियन्सचा संघ एक स्पर्धा जिंकला होता. यावेळी मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नईमध्ये होता. यावेळी जेम्स फ्रँकलिन आणि अँड्र्यु सायमंड्स यांनी मद्यपान केलं होतं. जास्त मद्यपान केल्याने त्या दोघांनाही आपण काय करत आहोत याचं भान नव्हतं. त्यावेळी या दोघांनी चहलचे हात आणि पाय बांधत तोंडालाही टेप मारली. यानंतर त्यांनी चहलला स्वत:ला सोडून दाखव असं सांगितलं. चहलला बांधल्यानंतर जेम्स फ्रँकलिन आणि अँड्र्यु सायमंड्स पार्टीत मग्न झाले आणि चहलला आपण बांधलं आहे, हे विसरून गेले. सकाळी झाल्यावर हॉटेलचे कर्मचारी रुम साफ करण्यासाठी आले असताना त्यांनी चहलला वाईट अवस्थेत बघितले. त्यानंतर त्यांनी इतर कर्मचाऱ्यांना बोलावून चहलची सुटका केली.
कोण आहे जेम्स फ्रँकलिन?
जेम्स फ्रँकलिन हा न्यूझीलंडचा वेगवान माजी गोलंदाज आहे. फ्रँकलिनकडे चेंडू स्विंग करण्याचे कौशल्य होते. फ्रँकलिन हा 2011 ते 2013 या कालावधीमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. फ्रँकलिनने 2019 साली इंग्लंडमधील कौंटी संघ असलेल्या डरहॅममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. फ्रँकलिन अजूनही या संघाचा प्रशिक्षक असून आता या गंभीर आरोपांनंतर डरहॅमचा संघ फ्रँकलिनची चौकशी करणार आहे.
कोण आहे अँड्र्यु सायमंड्स?
अँड्र्यू सायमंड्स हा एक माजी ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू आहे. तो सर्व तीन फॉरमॅट फलंदाजीमधील अष्टपैलू मानला जायचा. सायमंड्स आयपीएलमध्ये पहिल्यांदा हैदराबादच्या संघाकडून 2008 साली खेळला होता. त्यानंतर तो 2011 साली मुंबई इंडियान्सच्या संघाकडून खेळला. त्याने 2012 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- IPL 202, CSK vs RCB: चेन्नईनं सामना जिंकला! आधी फलंदाजांनी चोपलं, नंतर गोलंदाजांनी रोखलं; बंगळुरूचा 23 धावांनी पराभव
- Weight Loss : लठ्ठपणा टाळण्यासाठी तीन सोप्या टिप्स, नक्की ट्राय करा
- Viral Video : बाथरूम सिंकमध्ये अंघोळ करतंय माकडाचं पिल्लू, तुम्ही व्हिडीओ पाहिला का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha