T20 WC 2024: भारताचा आयसीसी स्पर्धेच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपणार? युवराज सिंगनं रोहित सेनेला वर्ल्ड कप विजयाचं सूत्र सांगितलं
Yuvraj Singh: भारतीय क्रिकेट संघाला गेल्या 10 वर्षांपासून आयसीसी स्पर्धांमध्ये विजय मिळवता आलेला नाही. टी 20 वर्ल्ड कपमध्ये आयसीसी ट्रॉफी विजयाचा दुष्काळ संपेल, अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे.
न्यूयॉर्क: वेस्ट इंडिज आणि अमेरिकेनं संयुक्त विद्यमाने टी-20 वर्ल्ड कपचं (T 20 World Cup 2024) आयोजन केलं आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील लढतीनं टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात झालेली आहे. अमेरिकेनं पहिल्याच सामन्यात विजय मिळवला आहे. भारतीय संघाची (Team India) पहिली मॅच 5 जूनला आयरलँड विरुद्ध होणार आहे. भारताला गेल्या 10 वर्षांमध्ये आयसीसीच्या स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवता आलेलं नाही. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ आयसीसीच्या स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ संपवेल, अशी आशा कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे. भारताला पहिला टी-20 वर्ल्ड कप मिळवून देणाऱ्या संघाचा सदस्य असलेल्या युवराज सिंगनं (Yuvraj Singh) या संदर्भात टीम इंडियाला मोठा सल्ला दिला आहे.
दुसऱ्या संघांवर लक्ष देण्याऐवजी....
भारतीय क्रिकेट संघाला आयसीसी स्पर्धा जिंकण्यासाठी काय करावं लागेल या प्रश्नाचं उत्तर भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगनं उत्तर दिलं आहे. रोहित शर्मानं (Rohit Sharma) आणि टीम इंडियानं टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी कशी मानसिकता ठेवली पाहिजे या प्रश्नाचं उत्तर देखील युवराज सिंगनं दिलं आहे. भारताच्या क्रिकेट टीममध्ये कौशल्य आणि आत्मविश्वासाची कमी नाही. टी-20 वर्ल्ड कपमध्ये विरोधी टीमवर लक्ष देण्याऐवजी आपल्या क्षमतेसह खेळले तर आयसीसी ट्रॉफी विजयाची दीर्घ काळाची प्रतीक्षा संपू शकेल, असं युवराजनं म्हटलं. रोहित शर्माच्या संघाला यावर काम करण्याची गरज असल्याचं देखील तो म्हणाला.
मोठ्या स्पर्धा जिंकण्यासाठी आपल्याकडे आत्मविश्वास आहे.. जर भारतानं...
युवराज सिंगं पुढं म्हटली की मोठ्या स्पर्धा जिंकण्यासाठी आपल्याकडे आत्मविश्वास आहे. भारतीय संघाला स्वत: वर विश्वास ठेवावा लागेल. याशिवाय ते पूर्ण क्षमतेनं खेळले तर ते विजेतेपद आपल्या नावावर करु शकतात. आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या पूर्वतयारीसाठी आयपीएल चांगला मंच असल्याचं देखील युवराज सिंगनं म्हटलं. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यात यशस्वी ठरल्यास तो शानदार क्षण असेल, असंही युवराज सिंगनं म्हटलं. युवराज सिंगनं फायनलमध्ये भारताशिवाय वेस्ट इंडिज किंवा पाकिस्तान पोहोचू शकतात, ते प्रबळ दावेदार आहेत, असं म्हटलं.
संबंधित बातम्या :