Year Ender: 2022 वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये पंतसह बुमराहची हवा, बीसीसीआयनं खास पोस्ट शेअर करत सांगितली आकडेवारी
Rishabh Pant-Jasprit Bumrah: भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये 2022 वर्षाभरात ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी सर्वोत्तम कामगिरी केली.
Rishabh Pant-Jasprit Bumrah Test Performance 2022 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) 2022 साली ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांच्या कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) दिलेल्या योगदानाचे कौतुक करत खास पोस्ट शेअर केली आहे. बीसीसीआयने या दोन्ही क्रिकेटपटूंचे यंदाच्या वर्षभरात कसोटीतील शानदार कामगिरीबद्दल अभिनंदन केले. पंत आणि बुमराह यांनी यावर्षी भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. ज्यामुळे या दोघांचे खास एडिटेड फोटो त्यांच्या वर्षभरातील कसोटी क्रिकेटमधील आकडेवारीनुसार बीसीसीआयनं पोस्ट केले आहेत.
पाहा बीसीसीआयची खास पोस्ट-
A look at #TeamIndia's Top Performers in Test cricket for the year 2⃣0⃣2⃣2⃣ 🫡@RishabhPant17 @Jaspritbumrah93 pic.twitter.com/YpUi2rjo3P
— BCCI (@BCCI) December 31, 2022
पंतच्या नावावर कसोटीत सर्वाधिक धावा
2022 मध्ये भारताकडून कसोटी क्रिकेटमधील फलंदाजांमध्ये, ऋषभ पंत हा यादीत अव्वल स्थानावर आहे. या वर्षात कोणत्याही भारतीय फलंदाजाने त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या नाहीत. पंतने 2022 मध्ये 7 कसोटी खेळल्या आणि 12 डावात 680 धावा केल्या. यादरम्यान त्याने 2 शतकं आणि 4 अर्धशतकंही झळकावली. यंदा पंतची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या 146 धावा होती. त्यामुळे तो 2022 मध्ये भारतीय संघासाठी कसोटीतील सर्वोच्च कामगिरी करणारा फलंदाज ठरला आहे.
बुमराहची अप्रतिम गोलंदाजी
2022 मध्ये भारताकडून कसोटी क्रिकेटमधील गोलंदाजीबद्दल बोलायचे तर जसप्रीत बुमराह हा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. या वर्षी त्याने टीम इंडियासाठी 5 कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने सर्वाधिक 22 विकेट घेतल्या. यादरम्यान 24 धावांत 5 गडी बाद करणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. 2022 मध्ये तो दोन वेळा एका डावात पाच विकेट घेण्यात यशस्वी ठरला होता. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये बुमराहने भाग घेतला असता तर त्याचे आकडे अधिक आकर्षक होऊ शकले असते. जसप्रीत बुमराह सध्या संघाबाहेर असून तो दुखापतीतून सावरत आहे. बुमराहच्या कामगिरीत आणखी सुधारणा होऊ शकली असती. पण दुखापतीमुळे तो बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकला नाही. तसंच बुमराह दुखापतीमुळे बराच काळ संघाबाहेर असून तो टी-20 विश्वचषकही खेळू शकला नाही.
हे देखील वाचा-