एक्स्प्लोर

WPL 2023 : एलिमिनेटरच्या सामन्यात मुंबई-युपी आमने-सामने, पिच रिपोर्टपासून ते लाईव्ह स्ट्रिमिंग, सर्व माहिती एका क्लिकवर

MI-W vs UPW-W, Match Preview : मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्समध्ये आज एलिमिनेटरचा सामना रंगणार आहे. जिंकणारा संघ दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध फायनल खेळणार आहे.

WPL 2023 :  महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेचा प्लेऑफ सामना आज (24 मार्च) होणार आहे. डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सच्या महिला संघांमध्ये हा सामना होणार आहे. हा प्लेऑफ दोन्ही संघांसाठी करो या मरो असाच असणार आहे. एलिमिनेटर जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहोचेल. जिथे त्याचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. चांगल्या नेट रनरेटमुळे दिल्लीचा संघ प्रथम स्थानावर राहिला आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सच्या (MI vs UPW) महिला संघांमध्ये खेळल्या जाणार्‍या आजच्या सामन्यातील संभाव्य प्लेइंग-11, खेळपट्टीचा अहवाल, हवामान अहवाल आणि एलिमिनेटर सामन्याचे थेट प्रसारण याबद्दल जाणून घेऊ...

पिच रिपोर्ट काय म्हणतोय?

डीवाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील प्लेऑफ सामना रंगणार आहे. येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. दुसऱ्या डावात फिरकीपटू प्रभावी ठरतात. येथे 165 धावांची धावसंख्या आव्हानात्मक असेल. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल.

कसा आहे हवामानाचा अहवाल?

मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स सामन्यादरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. सामन्यादरम्यान काही ढग असतील पण बहुतेक आकाश निरभ्र असेल. 40 षटकांचा कोटा असलेला सामना कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल.

मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सचे संभाव्य प्लेईंग 11

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग-11: हरमनप्रीत कौर (कर्णधार), यस्तिका भाटिया, सायका इशाक, अमनजोत कौर, हेली मॅथ्यूज, नाटे सिव्हर ब्रंट, अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता, इस्सी वोंग.

यूपी वॉरियर्सचे संभाव्य प्लेईंग-11: एलिसा हिली (कर्णधार), किरण नवगिरे, श्वेता सेहरावत, सिमरन शेख, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, सोप्पधंडी यशश्री, पार्श्वी चोप्रा, सोफी एक्लेस्टोन, शबनीम इस्माईल, अंजली सरवानी.

सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?

मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स या महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा

व्हिडीओ

Ram Shinde On Pawar | Nagpur | पवार कुटुंबीयांचा डान्स आणि राजकारणही एकत्र असतं - राम शिंदे
Nagpur Winter Season : चहापानाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहणार
MVA PC Winter Session :  ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Embed widget