एक्स्प्लोर

WTC Final Team India : भारताची WTC फायनलमधील जागा झाली पक्की! पण, एक गोष्ट जी चिंता वाढवणार, जाणून घ्या समीकरण

WTC Final Points Table :  रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया फायनलसाठी पात्र ठरू शकेल का, हा प्रश्न आहे.

World Test Championship Final Points Table : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 11 जून 2025 रोजी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे. पण रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया फायनलसाठी पात्र ठरू शकेल का, हा प्रश्न आहे. यासोबत भारतीय संघ पहिल्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकू शकेल का? खरंतर, चेन्नई कसोटीत भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव केला. यानंतर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. सध्या भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये भारत 71.67 च्या विजयी टक्केवारीसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याच वेळी, आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील अंतर 9.16 टक्के झाले आहे. ऑस्ट्रेलियाचे 62.50 टक्के गुण आहेत. मात्र, आता भारताचे समीकरण काय? खरंतर, भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी 9 कसोटी खेळायच्या आहेत, त्यापैकी 5 जिंकायच्या आहेत. जर टीम इंडिया 4 कसोटी जिंकण्यात यशस्वी ठरली आणि 1 कसोटी अनिर्णित राहिली, तरीही ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. पण, एक गोष्ट जी चिंता वाढवणार आहे, ती म्हणजे भारताचे पुढील सामने तगड्या संघांसोबत आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटीशिवाय, भारतीय संघाला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळायची आहे. टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ भारत दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. वास्तविक, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टीने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खूप महत्त्वाची ठरणार आहे, पण यावेळी पॉइंट टेबलवर नजर टाकली तर भारत अंतिम फेरीत खेळणार हे जवळपास निश्चित आहे.

हे ही वाचा -

Drona Desai Record : 7 षटकार, 86 चौकार अन् 498 धावांची मॅरेथॉन इनिंग; 18 वर्षीय पठ्ठ्याचा धमाका, 'रेकॉर्ड बुक'मध्ये नोंद

Shreyas Iyer : श्रेयस अय्यरने केली मुंबईत करोडोंची गुंतवणूक; आईसोबत खरेदी केले आलिशान अपार्टमेंट, किंमत किती?

Ind vs Ban: टीम इंडियाचे कानपूरमध्ये जोरदार स्वागत; रोहित शर्मा-विराट कोहलीने वेधलं चाहत्यांचं लक्ष

 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-4 Live : दुसऱ्या डावात टीम इंडिया 193 धावांवर ऑलआऊट! श्रीलंकेसमोर 372 धावांचं लक्ष्य; आता प्रत्येक चेंडू ठरणार निर्णायक, जाणून घ्या LIVE अपडेट्स
दुसऱ्या डावात टीम इंडिया 193 धावांवर ऑलआऊट! श्रीलंकेसमोर 372 धावांचं लक्ष्य; आता प्रत्येक चेंडू ठरणार निर्णायक, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Rishabh Pant 100 sixes in Tests : अद्भूत, अविश्वसनीय...कसोटीत 100 षटकार ठोकणारा ऋषभ पंत पहिला भारतीय, तर जागतिक तिसरा क्रिकेटपटू; यादीत कुणाकुणाचा समावेश?
अद्भूत, अविश्वसनीय...कसोटीत 100 षटकार ठोकणारा ऋषभ पंत पहिला भारतीय, तर जागतिक तिसरा क्रिकेटपटू; यादीत कुणाकुणाचा समावेश?
IND vs SL 1st Test : आऊट देताच केएल मैदानाबाहेर निघाला, पडिक्कल म्हणाला, अरे थांब...; पुढे जे घडलं, ते पाहून सगळे हसत बसले, VIDEO
आऊट देताच केएल मैदानाबाहेर निघाला, पडिक्कल म्हणाला, अरे थांब...; पुढे जे घडलं, ते पाहून सगळे हसत बसले, VIDEO
Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Embed widget