एक्स्प्लोर

India Vs Pakistan: विश्वचषकात भारताला एकदाही हरवू शकला नाही पाकिस्तान, 'या' सामन्यांची आजही चर्चा

India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामान म्हणजे चाहत्यांसाठी युद्ध असते. हा सामना जर विश्वचषकातील असेल तर त्याला महासंग्रामाचे रुप धारण होते

India Vs Pakistan: टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2021) सुरुवात झाली असून भारत आणि पाकिस्तान या महामुकाबल्याचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. येत्या रविवारी (24 ऑक्टोबर) भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. मात्र, त्याआधी या सामन्याची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आणि उत्सुकता दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामान म्हणजे चाहत्यांसाठी युद्ध असते. हा सामना जर विश्वचषकातील असेल तर त्याला महासंग्रामाचे रुप धारण होते. दरम्यान, विश्वचषकात भारत पाकिस्तानविरुद्ध  एकदाही पराभूत झालेला नाही.

विश्वचषकात भारताने पाकिस्तानाविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघाचे कर्णधारपद सध्या विराट कोहलीकडे आहे. हा विक्रम कायम ठेवण्याचा विराट कोहलीचा प्रयत्न असेल. त्यामुळे या सामन्यात नेमके काय होते? याकडे सर्वांचे डोळे लागलेले असतील. 

पाकिस्तानात कोहलीपेक्षा 'या' भारतीय खेळाडूला जास्त पसंती, शोएब अख्तरचा खुलासा

एकदिवसीय विश्वचषक 1992 ग्रुप स्टेज मॅच, सिडनी

भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा 1992 मध्ये एकमेकांच्या समोर आले होते. या सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली होती. त्यावेळी भारतीय संघाने सात विकेट्स गमावून 216 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला पाकिस्तानच्या संघाने भारताच्या गोलंदाजीपुढे गुडघे टेकले. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 173 धावांवर ऑलआऊट करून 43 धावांनी विजय मिळवला होता. मोहम्मद अजहरुद्दीनच्या नेतृत्वात हा सामना खेळण्यात आला होता. 

टी-20 विश्वचषक 2007  ग्रुप स्टेज मॅच, डरबन

पहिल्या टी-20 विश्वचषकात ग्रुपस्टेजमध्ये आमने-सामने आले होते. त्यावेळी हा सामना टाय झाला होता. या सामन्यात सुपर ओव्हर पाहायला मिळाली. ज्यात भारतीय संघाने 3-0 बॉल आऊट करून हा सामना जिंकला होता. या सामन्यात भारताकडून रॉबिन उथप्पा (50), महेंद्रसिंह धोनी (33) आणि इरफान पठाण (20) यांच्या खेळीच्या जोरावर संघाने सन्मानजनक स्कोर केला होता. 

एकदिवसीय विश्वचषक 1996 क्वार्टर फायनल मॅच, बंगळरू

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1996मध्ये क्वार्टर फायनल सामना खेळण्यात आला होता. हा सामना अतिशय रोमांचक होता. हाय व्होल्टेज सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. या सामन्यात नवज्योत सिद्धूने सर्वाधिक 93 धावा केल्या. तर, अजय जाडेजाने 45 धावा केल्या. भारताने 8 गडी गमावून 287 धावा केल्या. पाकिस्तानकडून मुश्ताक अहमदने 56 धावांत 2 बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाला 248 धावा करू शकला. 

टी-20 विश्वचषक 2007 फायनल- 

पहिल्या टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघ पाकिस्तानशी भिडला होता. हा सामना भारतीय क्रिकेट चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. या सामन्यात केवळ 5 धावांनी विजय मिळवून भारतीय संघाने विश्वचषकावर नाव कोरले होते. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानसमोर 157 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला पाकिस्तानचा संघ 152 वर ऑलआऊट झाला. या सामन्यात मिस्बाह-उल-हकने सामना फिरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, अखेरच्या षटकात जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवर त्याने श्रीशांतला झेल दिला. 

टी-20 विश्वचषक 2021 च्या सराव सामन्यात भारताकडून चांगली कामगिरी पाहायला मिळते. भारताने पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध सात विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 8 विकेट्सने पराभूत केले. भारताकडून पुढेही अशीच कामगिरी पाहायला मिळेल? अशी अपेक्षा केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 4th T20 : एका सामन्यात 10 विक्रम, शाई होप-संजू सॅमसनचा जलवा! टी-20 क्रिकेटमध्ये नेमकं काय घडलं?
एका सामन्यात 10 विक्रम, शाई होप-संजू सॅमसनचा जलवा! टी-20 क्रिकेटमध्ये नेमकं काय घडलं?
IND vs WI 4th T20 : वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
IND vs WI 4th T20 Highlights : गोलंदाजांमुळेच भारताचा पराभव! श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं, 18 व्या षटकाने फिरवला सामन्याचा निकाल, नेमकं काय घडलं?
गोलंदाजांमुळेच भारताचा पराभव! श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं, 18 व्या षटकाने फिरवला सामन्याचा निकाल, नेमकं काय घडलं?
IND vs WI 4th T20 Highlights : सॅमसन एकटा लढला, बाकीचे अभिषेक-ईशान-अय्यर सगळे ढेपाळले! वेस्ट इंडिजने भारताला नमवत मालिकेत साधली बरोबरी
सॅमसन एकटा लढला, बाकीचे अभिषेक-ईशान-अय्यर सगळे ढेपाळले! वेस्ट इंडिजने भारताला नमवत मालिकेत साधली बरोबरी

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
Gunaratna Sadavarte on Pradeep Purnekar case: प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Rajendra Shinde and Pradeep Purnekar: अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले,
अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले, "होय, मी प्रदीप पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना ओळखतो"
IND vs WI 4th T20 : वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
Nana Patekar Death Tanushree Dutta: 'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
Embed widget