AUS vs SA T20 WC Final : विश्वचषकाच्या फायनलमध्ये नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
AUSW vs SAW: महिला टी20 वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना सध्या खेळवला जात असून ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
![AUS vs SA T20 WC Final : विश्वचषकाच्या फायनलमध्ये नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय Women's T20 World Cup 2023 Final South Africa women against Australia Women AUS Won toss and elected to bat first AUS vs SA T20 WC Final : विश्वचषकाच्या फायनलमध्ये नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/26/163ca9ac48ee9c6e8d2b2da79ffe3fa01677413580330507_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
SA vs AUS, WT20 Final : महिला T20 विश्वचषक (Womens T20 WC) 2022 स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमध्ये खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिका येथील प्रसिद्ध अशा केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर हा जेतेपदाचा सामना होत आहे. नुकतीच नाणेफेक पार पडली असून टॉस जिंकत ऑस्ट्रेलियन महिलांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सेमीफायनलमध्ये बलाढ्य भारतालाही प्रथम फलंदाजीनंतरच ऑस्ट्रेलियाने मात दिली होती. आजही एक मोठी धावसंख्या निर्माण करुन दक्षिण आफ्रिका संघावर दबाव आणण्याचा कांगारुंचा डाव आहे. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ प्रथमच ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी होणार की ऑस्ट्रेलियाचा दबदबा कायम राहील, हे पाहणं आज महत्त्वाचं असेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा T20 रेकॉर्ड जबरदस्त आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. हे सर्व सामने जिंकण्यात ऑस्ट्रेलियन संघ यशस्वी ठरला. अलीकडेच या विश्वचषकात खेळल्या गेलेल्या सामन्यात कांगारू संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या या भक्कम विक्रमावरून दक्षिण आफ्रिकेचा अंतिम फेरीतील मार्ग सोपा नसेल हे दिसून येते. पण दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच विश्वचषक जिंकणार की ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
View this post on Instagram
कसे आहेत दोन्ही संघ?
दक्षिण आफ्रिका प्लेईंग इलेव्हन : लॉरा वोल्वार्ड, तझमिन ब्रिट्स, मारिझान कॅप, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, सुने लुस(कर्णधार), अनेके बॉश, सिनालो जाफ्ता(विकेटकिपर), शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा
ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन : अॅलिसा हिली (विकेटकिपर), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), ऍशलेग गार्डनर, ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा, जॉर्जिया वेरेहॅम, जेस जोनासेन, मेगन शुट, डार्सी ब्राउन
कुठे पाहता येणार सामना?
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
सेमीफायनलमध्ये भंग झालं भारताचं स्वप्न
दुसरीकडे स्पर्धेत सुरुवातीपासून दमदार कामगिरी करणारा भारतीय संघ (Team India) यंदा विश्वचषक जिंकेल असं वाटत होतं. पण सेमीफायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून 5 धावांनी पराभूत व्हावं लागलं. ज्यामुळे भारतीय महिला संघाचं विश्वचषक विजयाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 172 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल भारतीय संघ 167 धावांपर्यंत मजल मारु शकला.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)