फॅब-4 मधील सर्वोत्तम फलंदाज कोण?; स्टीव्ह स्मिथने घेतले भारतीय खेळाडूचे नाव
Virat Kohli: 2024 च्या T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात विराट कोहलीचा समावेश होणार की नाही?, याबाबत सध्या विविध चर्चा रंगत आहे.
Virat Kohli: विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 2024 च्या T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात विराट कोहलीचा समावेश होणार की नाही?, याबाबत सध्या विविध चर्चा रंगत आहे.
विराट कोहलीने आजपर्यंत त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 117 सामन्यांमध्ये 4,037 धावा केल्या आहेत आणि टी-20 फॉरमॅटमध्ये तो जगातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील आहे. याचदरम्यान आता ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे म्हटले आहे.
विराट कोहली सर्वोत्तम-
स्टार स्पोर्ट्सने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सोशल मीडिया प्रभावक कॅरीमिनाटी उर्फ अजय नगर आणि विशाल दायमा यांनी स्टीव्ह स्मिथची मुलाखत घेतली. दरम्यान, स्मिथला फॅब-4 मध्ये सर्वोत्तम फलंदाज कोण, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना स्मिथने विराट कोहलीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हटले आहे.
View this post on Instagram
धोनीपेक्षा चांगला कोणीही नाही-
याशिवाय स्टीव्ह स्मिथनेही धोनीबद्दल बोलताना सांगितले की धोनी ज्या पद्धतीने खेळ समजतो ते आश्चर्यकारक आहे. "भारतात स्टंपच्या मागे एमएस धोनीपेक्षा चांगला कोणी नाही. त्याच्यासोबत खेळणे हा एक चांगला अनुभव होता. मैदानावर आणि मैदानाबाहेर त्याचा सहवास मला खूप आवडला." स्मिथ पुढे म्हणाला की, धोनी खूप शांत आहे, साहजिकच खेळाच्या बाहेरच्या अनेक गोष्टींमध्ये खूप व्यस्त आहे, पण तो खूप शांत आणि डाउन टू अर्थ व्यक्ती आहे आणि एक अद्भुत व्यक्ती आहे. स्मिथ आयपीएलमध्ये आहे. यावेळी तो कॉमेंट्री करताना दिसत आहे.
स्मिथची कारकीर्द-
स्टीव्ह स्मिथने त्याच्या कसोटी कारकिर्दीत चांगली कामगिरी केली आहे. त्याने 108 कसोटी सामन्यांमध्ये 57.52 च्या उत्कृष्ट सरासरीने 9,665 धावा केल्या आहेत. पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विराट कोहलीसमोर स्मिथचे आकडे खूपच कमजोर दिसतात. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने 292 सामन्यांमध्ये 58.67 च्या सरासरीने 13,848 धावा केल्या आहेत आणि त्या तुलनेत स्मिथ खूप मागे आहे. कोहलीने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 51.75 च्या सरासरीने 4,037 धावा केल्या आहेत, परंतु स्टीव्ह स्मिथ 24.86 च्या सरासरीने फक्त 1,094 धावा करू शकला आहे. कोहलीला तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम फलंदाज म्हणता येईल, हे सिद्ध करण्यासाठी हे आकडे पुरेसे आहेत.