Virat Kohli: तैजूल इस्मालनं टाकला असा चेंडू की विराट झाला कन्फ्यूज; अवघ्या एका धावेवर गमावली विकेट
IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात चट्टोग्रामच्या (Chattogram) झहूर अहमद स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury) पहिला कसोटी सामना खेळला जातोय.
IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात चट्टोग्रामच्या (Chattogram) झहूर अहमद स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury) पहिला कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताची सुरुवात खराब झाली. भारतानं अवघ्या 48 धावांवर तीन विकेट्स गमावल्या.भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) रुपात भारताला तिसरा धक्का लागला. बांगलादेशचा फिरकीपटू तैजूल इस्मालनच्या (Taijul Islam) गोलंदाजीवर विराट कोहलीनं ज्या पद्धतीनं विकेट गमावली, हे पाहून सर्वच हैराण झाले आहेत.विराट कोहली बाद झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
भारताचा कर्णधार केएल राहुलनं टॉस जिंकून बांगलादेशच्या संघाला प्रथम गोलंदाजीचं आमंत्रण दिलं. या सामन्यात भारताकडून सलामी देण्यासाठी केएल राहुल आणि शुभमन गिल मैदानात आले. पण गिल आणि केएल राहुल अनुक्रमे 20 आणि 22 धावांवर बाद झाले. त्यानंतर विराट कोहली पाच चेंडूत एक धाव करून बाद झाला. त्याला तैजूल इस्मालनं एलबीडब्ल्यू केलं. कोहलीच्या बाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. नेटकरी त्याला ट्रोलही करत आहेत.
व्हिडिओ-
Back to back wicket for bangladesh..
— Nikesh Gohite🇮🇳 (@nikesh_gohite) December 14, 2022
Virat Kohli was only 99 runs away from the century 🥲🥲#ViratKohli𓃵 #ViratKohli #indvsbang #INDvBAN #klrahul #TestCricket pic.twitter.com/smsRJhC4xL
विराट कोहलीचा फॉर्म
विराट कोहलीनं 2019 मध्ये कसोटी क्रिकेटमधील अखेरचं शतक झळकावलं होतं. तर, त्याच्या बॅटमधून शेवटचे अर्धशतक 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निघालं होतं. या सामन्यात विराटनं 79 धावांची खेळी केली होती.त्यानंतर त्यानं सात खेळले.मात्र, त्याला एकही अर्धशतक झळकावता आलं नाही. कोहलीनं यापूर्वी जुलै 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळला. यामध्ये तो पहिल्या डावात 11 धावा आणि दुसऱ्या डावात 20 धावा करून बाद झाला. मात्र, बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्यानं 113 धावांची खेळी करत एकदिवसीय क्रिकेटमधील शतकांचा दुष्काळ संपवला होता.
बांगलादेशची प्लेईंग इलेव्हन:
झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम, यासिर अली, नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, खालेद अहमद, इबादोत हुसेन.
भारताची प्लेईंग इलेव्हन:
शुभमन गिल, केएल राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
हे देखील वाचा-