IND vs BAN : 12 वर्षांची प्रतिक्षा आणखी लांबणार, 'या' कारणामुळे जयदेव उनाडकट पहिल्या कसोटीत नाही
India vs Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 14 डिसेंबरपासून सुरुवात झाली असून जयदेव उनाडकट 12 वर्षानंतर कसोटी संघात पुन्हा दिसणार आहे.
Jaydev Unadkat :बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून (IND vs BAN Test Series) तब्बल 12 वर्षांनंतर भारताच्या कसोटी संघात वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) पुनरागमन करत आहे. पण त्याची मैदानात उतरण्याची प्रतिक्षा आणखी लांबल्याचं दिसून येत आहे. कारण उनाडकटला अजून बांगलादेशला जाण्यासाठी व्हिसा मिळू शकला नसल्याने तो पहिल्या कसोटी सामना खेळत नाही आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, 'उनाडकटला आतापर्यंत व्हिसा मिळालेला नाही आणि त्यामुळेच तो आतापर्यंत बांगलादेशला जाऊ शकलेला नाही.'
पहिला कसोटी सामना आजपासून (14 डिसेंबर) सुरू झाला आहे. भारत प्रथम फलंदाजी करत असून अंतिम 11 मध्ये जयदेव उनाडकट नाही. 12 वर्षानंतर त्याचं संघात नाव घेतल्यानंतर तो नक्कीच अंतिम 11 मध्ये असेल असे वाटत होते. पण बांगलादेशला तो पोहोचला नसल्याने अंतिम 11 मध्ये तो नसल्याचं दिसून येत आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उनाडकटचा व्हिसा अद्याप तयार झालेला नाही. पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी उनाडकट वेळेत बांगलादेशला पोहोचू शकला नाही. दरम्यान आता जयदेव दुसऱ्या सामन्यात तरी संघात असेल का? हे पाहावे लागेल.
पहिल्या कसोटीसाठी कसा आहे भारतीय संघ?
शुभमन गिल, केएल राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
शमीच्या जागी जयदेवची निवड
भारताचा आघाडीचा गोलंदाज मोहम्मद शामी दुखापतीमुळं बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून बाहेर पडलाय. त्याच्या जागी जयदेव उनाडकटचा भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला. 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जयदेव उनाडकट भारतीय कसोटी संघाचा भाग बनलाय. त्यानं 2010 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमध्ये एकमेव कसोटी खेळली होती. जयदेवनं भारतासाठी आतापर्यंत 1 कसोटी, 7 एकदिवसीय आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत
हे देखील वाचा-