IND vs ZIM: वॉशिंग्टन सुंदर ऐवजी संघात स्थान मिळालेला शाहबाज अहमद आहे तरी कोण?
India Tour of Zimbabwe 2022: भारतीय क्रिकेट संघाला (Team India) 18 ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे.
India Tour of Zimbabwe 2022: भारतीय क्रिकेट संघाला (Team India) 18 ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी वॉशिंग्टन सुंदरची (Washington Sundar) भारतीय संघात निवड झाली होती. परंतु, खांद्याच्या दुखापतीमुळं त्याला या मालकेला मुकावं लागलंय. त्याच्या ऐवजी भारतीय ए संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू शाहबाज अहमदचा (Shahbaz Ahmed) संघात समावेश करण्यात आलाय. त्यानंतर शाहबाज अहमद कोण आहे? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
इंग्लंड आणि वेस्ट इंडीजला त्यांच्याच मायभूमी नमवून भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलाय. येत्या 18 ऑगस्टपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने हेरारे स्पोट्स क्लबमध्ये खेळले जाणार आहे. महत्वाचं म्हणजे, झिम्बाब्वे दौऱ्यात भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मासह वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. ज्यामुळं भारताचा सलामीवीर केएल राहुलकडं भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलंय. केएल राहुलनं याआधीही भारतीय संघाचं नेतृत्व केलंय. परंतु, केएल राहुलच्या नेतृत्वात भारताला एकही सामना जिंकता आला नाहीये. यामुळं झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघ कशी कामगिरी करतोय? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
शाहबाज अहमद कोण आहे?
शाहबाज अहमद देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळतो. त्यानं भारतीय ए संघाचंही प्रतिनिधित्व केलंय. पण आता त्याला भारताच्या आंतरराष्ट्रीय संघाकडून कॉल आलाय. शाहबाज हा स्लो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहे. तो संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतो. त्याच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकल्यास तो प्रभावी ठरला आहे. शाहबाजनं प्रथम श्रेणी सामन्यांच्या 29 डावांमध्ये 1 हजार 41 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याच्या नावावर 57 विकेट्सचीही नोंद आहे. शाहबाजनं लिस्ट ए मध्ये 26 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 662 धावा केल्या आहेत. ज्यात दोन शतक आणि दोन अर्धशतकांसह 14 विकेट्सची नोंद आहे. एवढेच नव्हे तर, त्यानं आयपीएलमध्येही 29 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 13 विकेट्स घेण्यासोबत 279 धावा केल्या आहेत.
झिम्बाब्वे विरुद्ध भारतीय संघ भारतीय संघ:
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर शाहबाज अहमद.
हे देखील वाचा-