Virat Kohli’s New Phone : माझा फोन कोणी पाहिला का? नवाकोरा फोन हरवल्यावर ट्वीट शेअर करत कोहली म्हणाला...
Virat Kohli : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा फोन हरवल्याची बातमी त्याने स्वत: ट्वीट शेअर करत दिली असून अनेकजण हा एखादा स्टंट असल्याचंही म्हणत आहेत.
Virat Kohli loses new phone : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा नवा-कोरा फोन हरवल्याची माहिती समोर येत असून विराटने स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे. विराटनं ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'तुमचा नवा फोन बॉक्समधून काढण्यापूर्वीच हरवणं, याहून वाईट काहीच नसेल, कोणी माझा फोन पाहिला का?' दरम्यान विराटच्या या ट्वीटवर मोठ्या प्रमाणात रिप्लाय येत असून काही वेळातच हे ट्वीट तुफान व्हायरल झालं आहे. यावर अनेक नेटकरी हा एखादा स्टंट असून एखाद्या फोनच्या जाहीरातीचा याशी संबंध असेल असं म्हटलं जात आहे.
याशिवाय झोमॅटोनं यावर ट्वीट करत लिहिलं आहे, 'तुम्ही हवंतर आमच्याकडून आईसस्क्रीम मागवू शकता, वहिनींचा (Anushka Sharma) फोन यासाठी तुमची मदत करु शकतो. तसंच एका युजरने मिश्किलपणे लिहिलं आहे, आता यामुळे का होईना खेळावर लक्ष लागून राहिल. तर एका पेजनं चांगल्या मोबाईल डिलसाठी आम्हाला थेट मेसेज करा असंही लिहिलं आहे. तर आता खरचं विराटचा फोन हरवला आहे, की हा कोणता स्टंट आहे हे लवकरच कळेल...
Nothing beats the sad feeling of losing your new phone without even unboxing it ☹️ Has anyone seen it?
— Virat Kohli (@imVkohli) February 7, 2023
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत विराटवर साऱ्यांच्या नजरा
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे. या मैदानावर विराट कोहलीचा रेकॉर्ड पाहिला, तर तो आतापर्यंत खूप काही पाहायला मिळालं आहे. कोहलीने याठिकाणी तीन सामन्यांत 88.50 च्या प्रभावी सरासरीने 354 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन शतकी खेळीही पाहायला मिळाली, ज्यामध्ये कोहलीने एका डावात 213 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, कसोटी फॉरमॅटमध्ये विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्डही शानदार आहे. कोहलीने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या 20 कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत 48.06 च्या सरासरीने 1682 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 7 शतकं आणि 5 अर्धशतकांची खेळीही त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली आहे.
73 शतकं केली पूर्ण
विराट कोहलीनं नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धडाकेबाज खेळी केली. या सामन्यात त्याने 110 चेंडूत 166* धावा केल्या. त्यानं हे शतक ठोकत आपली 73 आंतरराष्ट्रीय शतकं पूर्ण केली असून त्याचं हे 46 व एकदिवसीय शतक होतं. त्याच्या खेळीत एकूण 13 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 150.91 होता. कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शतकं झळकावली. गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले होते.
हे देखील वाचा-