Border-Gavaskar Trophy : किंग कोहलीसाठी नॅथन लियॉन अडचण ठरणार? पाहा आतापर्यंतची आकडेवारी
IND vs AUS, Test Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणार्या कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत विराट कोहली आणि फिरकीपटू नॅथन लियॉन यांच्यातील लढत पाहण्यासारखी असेल.
IND vs AUS Test, Virat Kohli vs Nathan Lyon : भारतीय संघ (Team India) 2023 वर्षाच्या पहिल्या कसोटी मालिकेसाठी (Test Series) पूर्णपणे सज्ज दिसत आहे. टीम इंडिया ही मालिका घरच्या भूमीवर खेळणार आहे. मालिका 9 फेब्रुवारीपासून नागपुरात सुरू होत असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत (India vs Australia) रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्यांदाच भारतीय संघाची धुरा सांभाळणार आहे. दरम्यान या मालिकेत दोन्ही संघाच्या सर्वच खेळाडूंवर क्रिकेट रसिकाचं लक्ष असेल. पण भारतात मालिका असल्याने या मालिकेत फिरकी गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावतील. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकी गोलंदाज नॅथन लियॉन (Nathan Lyon) भारतीय संघासाठी अडचण ठरु शकतो. खासकरुन स्टार फलंदाज कोहलीसाठी (Virat Kohli) नॅथन धोकादायक ठरु शकतो. तर कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीसमोर नॅथनची आकडेवारी कशी आहे पाहूया...
कसोटी क्रिकेटमध्ये नॅथन लियॉनने आतापर्यंत विराट कोहलीला एकूण 782 चेंडू टाकले आहेत, ज्यामध्ये कोहलीने 58.6 च्या सरासरीने आणि 52.4 च्या स्ट्राइक रेटने 410 धावा केल्या आहेत. यादरम्यान लायनने कोहलीला एकूण 514 डॉट बॉल फेकले. सध्याच्या भारतीय खेळाडूंमध्ये कोहलीची लायन्सविरुद्धची सरासरी सर्वोत्तम आहे.
कोहलीने लियॉन किती चौकार मारले?
कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये नॅथनला एकूण 36 चौकार आणि 2 षटकार ठोकले आहेत.
नॅथनने कोहलीला किती वेळा आऊट केले?
आतापर्यंत कसोटीत नॅथनने विराट कोहलीला 7 वेळा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये लायनने 2013 मध्ये तीन वेळा, 2014 मध्ये एकदा, 2017 मध्ये एकदा आणि 2018 मध्ये दोनदा कोहलीला बाद केले होते. त्यामुळे यावेळी खेळल्या जाणार्या मालिकेत दोघांमध्ये मोठी लढत पाहायला मिळणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ (India’s squad for first 2 Tests vs Australia) -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), ईशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचं वेळापत्रक
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला कसोटी सामना | 9-13 फेब्रुवारी 2023 | नागपूर |
दुसरा कसोटी सामना | 17-21 फेब्रुवारी 2023 | दिल्ली |
तिसरा कसोटी सामना | 1-5 मार्च 2023 | धर्मशाला |
चौथा कसोटी सामना | 9-13 मार्च 2023 | अहमदाबाद |
हे देखील वाचा-