IND vs AUS T20 Series : ऑस्ट्रेलियासाठी विराट कोहली आहे सर्वात मोठं आव्हान, स्वत: पॅट कमिन्सनं दिली कबुली
Pat Cummins Press Conference : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार आणि मुख्य गोलंदाज पॅट कमिन्सने एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने आमच्यासमोर विराट मोठं आव्हान असेल अशी कबुली दिली.
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) आगामी टी-20 मालिकेत विराट कोहली ऑस्ट्रेलिया संघासाठी मोठं आव्हान असेल, असं म्हटला आहे. मालिकेपूर्वी रविवारी (18 सप्टेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत पॅटनं हे वक्तव्य केलं. यावेळी बोलताना कमिन्सनं टीम डेव्हिडचं पदार्पण आणि भारतीय खेळपट्ट्यांबाबतही सविस्तर चर्चा केली.
विराट कोहलीच्या फॉर्मबाबतच्या प्रश्नांचं उत्तर देताना पॅट म्हणाला, 'मी आशिया चषक पाहिला नाही, पण विराटने शतक झळकावल्याचं मला माहीत आहे. तो अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. त्याला कधी ना कधी फॉर्मात यायचे होते. त्यामुळे आगामी मालिका आमच्यासाठी आव्हानात्मक असेल.'
कसे आहेत दोन्ही संघ?
भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, उमेश यादव, दीपक चाहर.
ऑस्ट्रेलिया संघ
आरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), अॅश्टन अगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सेम्स, शॉन अॅबॉट.
कधी होणार सामने?
हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे. दरम्यान नाणेफेक ही 7 वाजता होणार आहे.
कुठे पाहता येणार सामने?
या तिन्ही सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेल्सवर केले जाणार आहे. या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमींग Disney+Hotstar Plus या अॅपवर पाहता येणार आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचं वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 20/09/2022 | ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम |
दुसरा टी-20 सामना | 23/09/2022 | विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, महाराष्ट्र |
तिसरा टी-20 सामना | 25/09/2022 | राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, हैदराबाद |
हे देखील वाचा-