Virat Kohli Ind vs Aus 1st ODI : जेव्हा लज्जाही लज्जेने लाजते... ऑस्ट्रेलियन भूमीवर विराट कोहलीसोबत पहिल्या सामन्यात काय घडलं? पाहा Video
India vs Australia 1st ODI : भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू झाला आहे. टीम इंडिया पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळत आहे.

Virat Kohli duck for first time in Australia : भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू झाला आहे. टीम इंडिया पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिशेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी दीर्घ विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले, ज्याची चाहते वाट पाहत होते. पण, विराट कोहली आणि रोहित शर्मा स्वस्तात बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला.
VIRAT KOHLI GONE FOR A DUCK!#AUSvIND pic.twitter.com/cg9GbcMRAE
— cricket.com.au (@cricketcomau) October 19, 2025
रोहित आणि कोहली झाले नापास
मिशेलचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरला, कारण भारतीय संघाने चौथ्या षटकात रोहित शर्माच्या रूपात एक महत्त्वाची विकेट गमावली. रोहितला फक्त 8 धावा करता आल्या. विराट कोहलीची कामगिरी रोहितपेक्षाही वाईट होती. कोहलीने 8 चेंडूंचा सामना केला, पण तो खाते न उघडता आऊट झाला. ऑस्ट्रेलियात ही दुर्मिळ घटना होती. खरं तर, विराट कोहली एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला आणि वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने त्याला शून्य धावांवर बाद केले.
स्टार्कच्या जाळ्यात अडकला 'विराट'
मिशेल स्टार्कने सातव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीला बाद केले. स्टार्कने हुशारीने विराट कोहलीची शिकार केली. कारण स्टार्कने पाचव्या षटकात आधी विराट कोहलीला खेळवले, ज्यामध्ये विराटने सगळे चेंडू खेळले आणि एक पण धाव घेतली नाही. त्यानंतर, जेव्हा विराट स्टार्कच्या पुढच्या षटकात सामना करण्यासाठी आला तेव्हा त्याने पहिल्याच चेंडूवर एक खराब शॉट खेळला.
An unsatisfactory start to the series for Ro-Ko ❌
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 19, 2025
This is Virat Kohli's first ODI duck in Australia! pic.twitter.com/IcPIY0dzQe
कूपर कॉनॉलीने घेतला शानदार झेल
विराटने ऑफ स्टंपच्या बाहेर एक शॉर्ट, गुड-लेन्थ चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू त्याच्या बॅटच्या बाहेर कट लागला आणि बॅकवर्ड पॉइंटकडे गेला, तेथे कूपर कॉनॉलीने झेल घेतला. रोहित आणि विराटनंतर, कर्णधार गिल देखील अपेक्षेनुसार खेळू शकला नाही, कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्या सामन्यात अपयशी ठरला. गिल 8 धावांवर आऊट झाला.
हे ही वाचा -





















