Women’s World Cup 2025 Semifinal Qualification : सेमीफायनलची दोन तिकिटं पक्की, टीम इंडियाचं गणित बिघडलं! पाकिस्तान बाहेर, जाणून घ्या वर्ल्डकपचं गणित
ICC Points Table Women’s World Cup 2025 Update : महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये आता दोन संघांनी उपांत्य फेरीचं तिकीट निश्चित केलं आहे.

Women’s World Cup 2025 Semifinal Qualification : महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये आता दोन संघांनी उपांत्य फेरीचं तिकीट निश्चित केलं आहे. शनिवारी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला, आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. या निकालाचा सर्वात मोठा फायदा झाला तो दक्षिण आफ्रिकेला. कारण ऑस्ट्रेलियानंतर सेमीफायनलमध्ये पोहोचणारा तो दुसरा संघ ठरला आहे.
उपांत्य फेरीचं गणित झालं रंजक
या वर्ल्ड कपमध्ये पावसामुळे अनेक सामने रद्द झाले असून त्यामुळे प्रत्येक सामन्यानंतर उपांत्य फेरीचं गणित अधिकच रंजक बनत चाललं आहे. आता अजून दोन स्थानं रिक्त आहेत, आणि त्यासाठी भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात तगडी लढत रंगली आहे. इंग्लंडकडे अजून तीन सामने बाकी असून त्यांना फक्त एक विजय उपांत्य फेरीत जाईल. म्हणजेच चौथ्या स्थानासाठी खरी झुंज भारत आणि न्यूझीलंडमध्ये आहे.
महिला वर्ल्ड कप 2025 मधून पाकिस्तान बाहेर
पाकिस्तान महिला वर्ल्ड कप 2025 मधून बाहेर गेला आहे. त्यांच्याकडे फक्त 2 गुण आहेत आणि दोन सामने बाकी आहेत. हे दोन्ही सामने जिंकले तरी ते जास्तीत जास्त 6 गुणांवर पोहोचतील. त्याच वेळी भारत आणि न्यूझीलंड दोघांकडेही सध्या 4 गुण आहेत. भारत चौथ्या तर न्यूझीलंड पाचव्या क्रमांकावर आहे. जर भारत आणि न्यूझीलंड पुढील सर्व सामने हरले, तरच पाकिस्तानला संधी मिळेल, जी अतिशय अवघड दिसते. श्रीलंका आणि बांगलादेशसुद्धा जास्तीत जास्त 6 गुणांपर्यंतच पोहोचू शकतात.
Two teams are through to the semis at #CWC25, but who will join them?
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 18, 2025
Check out the State of Play for all eight teams ➡️ https://t.co/Hetm5JkkfA pic.twitter.com/NYlojl6Cip
भारतासाठी काय आहे समीकरण?
भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी उरलेल्या तीन सामन्यांपैकी किमान दोन विजय आवश्यक आहेत. टीम इंडियाचा पुढील सामना रविवारी म्हणजे आज इंग्लंडविरुद्ध आहे, त्यानंतर न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध लढती आहेत. भारत जर तीनपैकी दोन सामने जिंकला, तर तो 8 गुणांसह सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करेल. मात्र पावसामुळे एखादा सामना रद्द झाला, तर भारताला एका पराभवाची किंमत चुकवावी लागू शकते.
न्यूझीलंड अजूनही सेमीफायनलच्या शर्यतीत आहे आणि भारतासाठी सर्वात मोठा धोका देखील आहे. कीवी संघालाही आता इंग्लंड आणि भारताशी सामना करायचा आहे. जर न्यूझीलंडने यापैकी एक सामना गमावला, तर भारताला मोठा फायदा होईल. पण भारतानेही स्वतःचे सामने जिंकणे अत्यावश्यक आहे, अन्यथा सेमीफायनलचं समीकरण पुन्हा बिघडू शकतं.
हे ही वाचा -
















