Virat Kohli : वनडेत विराटच किंग....सचिनलाही न जमलेला रेकॉर्ड केला
Virat Kohli ODIs Records : भारताची सुरुवात अतिशय खराब झाली, कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूवर तंबूत परतला. पण त्यानंतर विराट कोहलीने शुभमन गिलच्या साथीने डावाला आकार दिला.
Virat Kohli ODIs Records : भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये वानखेडेच्या मैदानावर (Wankhede Stadium) सामना सुरु आहे. भारताची सुरुवात अतिशय खराब झाली, कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूवर तंबूत परतला. पण त्यानंतर विराट कोहलीने शुभमन गिलच्या साथीने डावाला आकार दिला. रोहित शर्मा (Rohit Sharma) अवघ्या चार धावा काढून बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीने मोर्चा संभाळला.
श्रीलंकेविरोधात विराट कोहलीने (Virat Kohli) 34 धावा करताच मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) सचिनचा विक्रम मोडला आहे. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा एक हजार धावांचा विक्रम आता विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर जमा झालाय. विराट कोहलीने आठव्यांदा एका वर्षांत एक हजार धावांचा पल्ला पार केला आहे. याआधी विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांनी प्रत्येकी सात वेळा वनडे क्रिकेटमध्ये एका वर्षात एक हजारांपेक्षा जास्त धावा केल्या होता. आज विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला मागे टाकलेय.
Most 1000 runs in calender year in ODI history:
— Johns. (@CricCrazyJohns) November 2, 2023
Virat Kohli - 8*
Sachin Tendulkar - 7 pic.twitter.com/KMJTQBx4fs
विराट कोहलीने 2023 वर्षात वनडे क्रिकेटमध्ये 1000 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये आठव्यांदा वर्षात हजार धावांचा पल्ला पार केलाय. याआधी सचिन तेंडुलकर याने सातवेळा हा पराक्रम केला आहे.
विराट कोहलीने कधी कधी वर्षभरात एक हजार धावांचा पल्ला पार केला ?
वर्ष 2011: 34 सामने 47.62 च्या सरासरीने 1381 धावा (4 शतक आणि 8 अर्धशतक)
वर्ष 2012: 17 सामने 68.40 च्या सरासरीने 1026 धावा (5 शतक आणि 3 अर्धशतक)
वर्ष 2013: 34 सामने 52.83 च्या सरासरीने 1268 धावा (4 शतक आणि 7 अर्धशतक)
वर्ष 2014: 21 सामने 58.55 च्या सरासरीने 1054 धावा (4 शतक आणि 5 अर्धशतक)
वर्ष 2017: 26 सामने 76.84 च्या सरासरीने 1460 धावा (6 शतक आणि 7 अर्धशतक)
वर्ष 2018: 14 सामने 133.55 च्या सरासरीने 1202 धावा (6 शतक आणि 3 अर्धशतक)
वर्ष 2019: 26 सामने 59.86 च्या सरासरीने 1377 धावा (5 शतक आणि 7 अर्धशतक)
वर्ष 2023 : 1000 धावा
तीन वर्षानंतर विराट फॉर्मात -
विराट कोहली 2020 पासून लयीत नव्हता.. त्याच्या बॅटमधून धावा तर येत होत्या, पण मोठी खेळी येत नव्हती. पण आता विराट कोहलीची बॅट पुन्हा एकदा तळपायला सुरुवात झाली आहे. कोरोना काळात विराट कोहलीच्या बॅटमधून एकही शतक आले नव्हते. पण 2023 मध्ये विराट कोहली भन्नाट फॉर्मात आहे. 2019 मध्ये अखेरच्या वनडेत वर्षभरात एक हजार धावांचा पल्ला पार केला होता. त्यानंतर चार वर्षांनतर विराट कोहलीने पुन्हा एकदा वनडे क्रिकेटमध्ये वर्षभरात एक हजार धावांचा पल्ला पार केलाय.
विराट कोहलीने डाव सावरला -
वानखेडेच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार रोहित शर्मा चार धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीने गिलच्या साथीने डाव सावरला. विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी शतकी भागिदारी केली. विराट कोहलीने आपले अर्धशतकही पूर्ण केले. विराट कोहलीने 53 चेंडूत 52 धावांवर खेलत आहे. भारताने एक विकेट्सच्या मोबदल्यात 120 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.