(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virat Kohli : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत विराटचं अनोख 'शतक', अशा कामगिरी करणारा सहावा भारतीय
Virat Kohli : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत विराटने एक अनोखी कामगिरी करत नवा रेकॉर्ड केला आहे.
Virat Kohli : भारताचा कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड केले आहेत. पण मागील दोन वर्ष झालं त्याच्या बॅटमधून एकही शतक आलेलं नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील भारताच्या पहिल्या डावात विराट शतक झळकावेल असे वाटत होते. पण तो 79 धावांवर बाद झाला. पण दुसऱ्याच दिवशी विराटने एक अनोखं शतक नावे केलं आहे. विराटने 100 कसोटी झेल पूर्ण केले असून अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय क्षेत्ररक्षक आहे जो यष्टीरक्षक नाही. आयसीसीने याबाबत ट्वीट देखील केलं आहे.
विराटने दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला असताना दोन झेल घेतले आहेत. दुसरं सेशन संपताना भारताने आफ्रिकेचे 7 विकेट घेतले आहेत. आफ्रिकेने 176 धावा केल्या असून अजूनही 47 धावांची आघाडी भारताकडे आहे.
भारताला इतिहास रचण्याची संधी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 च्या बरोबरीत असून यामुळे भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे. कारण ही कसोटी जिंकताच भारत मालिकाही जिंकेल आणि दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा मान भारताला मिळेल. पण केपटाऊनमधला हा विजय भारताला सोपा नसून आतापर्यंत या मैदानात खेळलेल्या पाच पैकी पाच सामन्यात भारताला एकदाही विजय मिळवता आलेला नाही
हे देखील वाचा-
- IPL Auction 2022 Date: आयपीएल 2022 च्या लिलावाची तारीख ठरली, बंगळुरूत पार पडणार कार्यक्रम
- IPL Title Sponsor: टाटा ग्रुप आयपीएलचे नवे टायटल स्पॉन्सर, अध्यक्ष ब्रजेश पटेल यांची घोषणा
- IPL Auction Update: यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दीक पंड्या कर्णधार? बंगळुरू, अहमदाबाद संघाची धुरा सांभाळणार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha