IPL Title Sponsor: टाटा ग्रुप आयपीएलचे नवे टायटल स्पॉन्सर, अध्यक्ष ब्रजेश पटेल यांची घोषणा
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची आज बैठक झाली. या बैठकीनंतर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरबाबत महत्वाची घोषणा केलीय.
IPL Title Sponsor: आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची आज बैठक झाली. या बैठकीनंतर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरबाबत महत्वाची घोषणा केलीय. आयपीएलच्या पुढील हंगामात विवो ऐवजी टाटा ग्रुप टायटल स्पॉन्सर असणार आहे, अशी माहिती ब्रिजेश पटेल यांनी दिली. तसेच गव्हर्निंग कौन्सिलनं अहमदाबाद फ्रँचायझीच्या मालकीच्या सीवीसी कॅपटलला जाही करण्याच्या लेटर ऑफ इव्हेंटला मान्यता देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
लीगसोबतच्या प्रायोजकत्व करारासाठी विवोकडं काही वर्षे शिल्लक आहेत. परंतु या हंगामात टाटा मुख्य प्रायोजक राहतील. या लीगचे नाव आता टाटा आयपीएल असेल. विवोनं 2018 मध्ये वार्षिक 440 कोटी रुपये खर्चून शीर्षक हक्क विकत घेतले होते. गतवर्षी चायनीझ वस्तूंवरील बहिष्काराची मागणी लक्षात घेता बीसीसीआयनं विवोला माघार घेण्यास सांगितली होती आणि ड्रीम 11नं यूएईत झालेल्या आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले होते.
बोर्ड आणि विवो यांच्यातील पाच वर्षांचा करार 2020 सीझनपर्यंत होता. दरम्यान, एका वर्षाच्या ब्रेकमुळं हा करार 2023 पर्यंत वाढवण्यात आला. परंतु, आज झालेल्या बैठकीनंतर टाटा ग्रुप 2022 आणि 2023चे टायटल स्पॉन्सर असल्याची घोषणा करण्यात आलीय.
देशातील कोरोना परिस्थिची प्रभाव आयपीएलच्य आगामी हंगामावर पडण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2022 चे मेगा ऑक्शन दहा दिवसांनी पुढे जाऊ शकते. आयपीएल 2022 चे मेगा ऑक्शन सात आणि आठ फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता क्रिकेट वेबसाइट क्रिकबजने काही दिवसांपूर्वी वर्तवली होती.
हे देखील वाचा-
- Chris Morris Retires: दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर क्रिस मॉरिस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
- Ind vs SA 3rd Test: Capetown कसोटीत भारताला इतिहास रचण्याची संधी, कधी आणि कुठे पाहाल सामना?
- IPL Auction Update: यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दीक पंड्या कर्णधार? बंगळुरू, अहमदाबाद संघाची धुरा सांभाळणार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha