Washington Sundar Covid Positive: युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर कोरोनाबाधित, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय संघात खेळण्यावर प्रश्नचिन्ह
Washington Sundar Covid Positive: कोरोना महामारीने सर्व क्षेत्रात पुन्हा एकदा प्रसार करण्यास सुरुवात केली आहे. भारताचा वॉशिंग्टन सुंदर कोरोनाबाधित आढळला आहे.
Washington Sundar Covid Positive: भारतीय ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदरला (Washington Sundar) कोरोनाची बाधा झाली आहे. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सुंदरचा समावेश असून या मालिकेच्या काही दिवस आधीच सुंदरला कोरोनाची बाधा झाल्यामुळे तो या मालिकेक खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. एका रिपोर्टनुसार सुंदरला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली असून यामुळे तो दक्षिण आफ्रीकेला एकदिवसीय सामन्यांसाठी रवाना होणार नाही. दरम्यान बीसीसीआयने याबाबत अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे सामने 19 जानेवारीपासून सुरु होणार आहेत.
22 वर्षीय सुंदर बुधवारी एकदिवसीय संघातील इतर खेळाडूंसोबत दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार सुंदरला कोरोनाची बाधा काही दिवसांपूर्वी झाली असून तो मुंबईतील एका हॉटेलमध्ये विलगीकरणात होता. पण आता तो बुधवारी संघासोबत आफ्रिकेला रवाना होणार नाही.
एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ -
के. एल. राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), यजुवेंद्र चहल, आर. अश्विन, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
एकदिवसीय सामने
19 जानेवारी 2022 - बोलंड पार्क, पार्ल - दुपारी दोन वाजता
21 जानेवारी 2022 - बोलंड पार्क, पार्ल - दुपारी दोन वाजता
23 जानेवारी 2022 - न्यू लँड्स क्रिकेट ग्राऊंड, केपटाऊन - दुपारी दोन वाजता
हे देखील वाचा-
- Chris Morris Retires: दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर क्रिस मॉरिस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
- IPL Auction Update: यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दीक पंड्या कर्णधार? बंगळुरू, अहमदाबाद संघाची धुरा सांभाळणार?
- SA Vs IND 3rd Test: केपटाऊनमध्ये विराट कोहली रचणार इतिहास, विक्रमापासून फक्त 14 धावा दूर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha