IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकत विराट कोहलीनं नावावर केला मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा दुसराच फलंदाज
Virat Kohli :भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कोहली आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.
IND vs AUS, Virat Kohli : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात (IND vs AUS 4th Test) विराट कोहलीने (Virat Kohli) दीर्घकाळानंतर शतक झळकावलं. कोहलीने 5 चौकारांच्या मदतीने आपलं शतक पूर्ण केलं. त्यानंतर त्यानं 150 धावाही पूर्ण केल्या असून पण याआधीच अर्धशतकापूर्वीही त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजचा फलंदाज ब्रायन लाराला (Brain Lara) मागे टाकून कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.
विराटने या सामन्यात पन्नास धावांचा टप्पा पार करताच, त्याचवेळी वेस्ट इंडिजचा अनुभवी खेळाडू ब्रायन लाराला मागे टाकले. ब्रायन लारा ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 82 आंतरराष्ट्रीय सामने (कसोटी आणि एकदिवसीय) खेळला. यादरम्यान त्याने 12 शतकांच्या मदतीने 4714 धावा केल्या. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 277 धावांची इनिंग खेळली होती.तर कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत 89 आंतरराष्ट्रीय (T20, ODI, कसोटी) सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 50.84 च्या सरासरीने 16 शतके, 23 अर्धशतकं झळकावली आहेत. कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत 4700 हूनही अधिक धावा केल्या आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (Sachin tenulkar) नावावर आहे. त्याने कांगारूंविरुद्ध 110 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 20 शतके आणि 31 अर्धशतकांच्या मदतीने 49.68 च्या सरासरीने 6707 धावा केल्या आहेत. कोहली सचिनच्या या विक्रमापासून बराच दूर असला तरी जगातील इतर फलंदाजांना त्याने पछाडलं आहे.
जवळपास तीन वर्षानंतर ठोकलं शतक
विशेष म्हणजे जवळपास 3 वर्षानंतर म्हणजे 1205 दिवसानंतर कोहलीनं कसोटी शतक ठोकलं आहे. याआधी अखेरचं कसोटी शतक कोहलीनं बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबर 2019 मध्ये ठोकलं होतं. त्यानंतर थेट आता त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्च 2023 मध्ये शतक ठोकलं आहे. आजच्या डावात विराटनं केवळ 5 चौकार ठोकत हे शतक केलं आहे. एकही षटकार त्यानं आज ठोकलेला नाही. दरम्यान 2019 साली कसोटी फॉरमॅटमध्ये शेवटचे शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीची फलंदाजीची सरासरीही गेल्या 20 कसोटी डावांमध्ये खूपच खराब होती. ज्यामध्ये त्याने केवळ 25 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याच्या बॅटने फक्त एकदाच 50 हून अधिक धावांची खेळी पाहिली होती, जी डिसेंबर 2021 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यादरम्यान आली होती. पण आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक ठोकल्यावर विराट पुन्हा फॉर्मात परतेल अशी आशा फॅन्सना आहे.
हे देखील वाचा-