एक्स्प्लोर

Virat Kohli Century : किंग इज बॅक! विराटचं ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक! कसोटी क्रिकेटमध्ये दिर्घकाळानंतर ठोकली सेंचूरी

IND vs AUS, 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु अहमदाबाद कसोटी सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं शानदार शतक झळकावलं आहे.

IND vs AUS, 4th Test : भारतीय संघाचा स्टार फलंदाज, जागतिक क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्याच काळानंतर शतक ठोकत पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसह भारतीय क्रिकेट फॅन्सना खुश केलं आहे. 241 चेंडूत कोहलीनं शतक ठोकलं असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ अडचणीत असताना हे शतक ठोकत विराटनं संघासाठी महत्त्वाची कामगिरी केली आहे. विराटच्या कारकिर्दीतील हे 75 वं शतक असून 28 वं कसोटी शतक आहे.

विशेष म्हणजे जवळपास 3 वर्षानंतर म्हणजे 1205 दिवसानंतर कोहलीनं कसोटी शतक ठोकलं आहे. याआधी अखेरचं कसोटी शतक कोहलीनं बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबर 2019 मध्ये ठोकलं होतं. त्यानंतर थेट आता त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्च 2023 मध्ये शतक ठोकलं आहे. आजच्या डावात विराटनं केवळ 5 चौकार ठोकत हे शतक केलं आहे. एकही षटकार त्यानं आज ठोकलेला नाही. दरम्यान 2019 साली कसोटी फॉरमॅटमध्ये शेवटचे शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीची फलंदाजीची सरासरीही गेल्या 20 कसोटी डावांमध्ये खूपच खराब होती. ज्यामध्ये त्याने केवळ 25 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याच्या बॅटने फक्त एकदाच 50 हून अधिक धावांची खेळी पाहिली होती, जी डिसेंबर 2021 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यादरम्यान आली होती. पण आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक ठोकल्यावर विराट पुन्हा फॉर्मात परतेल अशी आशा फॅन्सना आहे.

विराटने पूर्ण केले 300 झेल

याच सामन्यात विराट कोहलीने कांगारुच्या पहिल्या डावात नॅथन लियॉनचा झेल घेताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 300 झेल पूर्ण केले आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीतील एकदिवसीय-कसोटी आणि टी-20 सह 494 वा सामना खेळला आहे. ज्यामध्ये त्याने आतापर्यंत 299 झेल घेतले होते. पण आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 झेल पूर्ण झाले आहेत. 300 झेल पूर्ण होताच विराट कोहलीने कॅचचं त्रिशतक पूर्ण केले आहे. अश्विनच्या चेंडूवर त्याने स्लिप्समध्ये नॅथन लायनचा अप्रतिम झेल घेतला. अहमदाबाद कसोटीत त्याने ही कामगिरी केली. 300 झेल घेणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे, त्याच्या आधी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ही कामगिरी केली होती. द्रविडने 334 झेल घेतले आहेत. सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत विराट कोहली सातव्या स्थानावर आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
Sushma Andhare: अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
Weather Update: कमी दाबाचा पट्टा विरळ, पण पावसाचा मुक्काम कायम, पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान? IMDचा अंदाज वाचा 
कमी दाबाचा पट्टा विरळ, पण पावसाचा मुक्काम कायम, पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान? IMDचा अंदाज वाचा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Raj Thackeray : पालिका निवडणुकीत जिथं शक्य तिथं राज ठाकरेंना सोबत घेणार :फडणवीसCongress Rajya Sabha : राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकाखाली 500 च्या नोटा Special ReportMira Road Special Report : मीरा रोडमध्ये वृद्ध महिलेला ठेवलं डांबून, ज्येष्ठांची सुरक्षा वाऱ्यावर?Allu Arjun Pushpa 2 Movieपुष्पा 2 सिनेमाची पहिल्याच दिवशी 'पुष्पा2' ने कमावले 175 कोटीSpecial Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
Sushma Andhare: अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
Weather Update: कमी दाबाचा पट्टा विरळ, पण पावसाचा मुक्काम कायम, पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान? IMDचा अंदाज वाचा 
कमी दाबाचा पट्टा विरळ, पण पावसाचा मुक्काम कायम, पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान? IMDचा अंदाज वाचा 
Solapur News: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेयकादेशीर कर्जवाटप प्रकरणी मोठी कारवाई, वसुलीचे आदेश निघाले; दिलीप सोपल, विजयसिंह मोहिते पाटलांना मोठा झटका
महायुती सरकार ॲक्शन मोडमध्ये; दिलीप सोपल, मोहिते-पाटलांना कोट्यवधी रुपयांच्या वसुलीच्या नोटीस धाडल्या
Maharashtra Vidhan Sabha adhiveshan: नव्या आमदारांना रविवारीही सुट्टी नाही, दोन दिवसांत शपथविधी, 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड
नव्या आमदारांना रविवारीही सुट्टी नाही, दोन दिवसांत शपथविधी, 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड
Shrikar Pardeshi :  मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
Embed widget