Team India : 'या' खेळाडूच्या संघात येण्याने होऊ शकतो श्रेयस अय्यरचा 'पत्ता कट', वसिम जाफरचं मोठं वक्तव्य
IND vs SA : माजी भारतीय खेळाडू वसिम जाफर यांनी भारतीय संघाच्या मिडल ऑर्डरमध्ये काही मोठे बदल होऊ शकतात, ज्यामुळे श्रेयस अय्यरचं स्थान धोक्यात असल्याचं भाकित केलं आहे.
Wasim Jaffer On Shreyas Iyer : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरची बॅट शांतच दिसत आहे. त्याने तिनही सामन्यात खास कामगिरी केली नसल्याचं दिसून आलं आहे. त्यात आता आयर्लंडविरुद्धच्या दौऱ्यात त्याचं नावही नसून सूर्यकुमारही दुखापतीतून सावरुन संघात परतला आहे. ज्यामुळे भारताचा माजी फलंदाज वसिम जाफरने सूर्यकुमार आणि विराट कोहली यांच्या संघात परतल्यानंतर श्रेयसला संघाबाहेर जावं लागू शकतं असं विधान केलं आहे. श्रेयस अय्यरचा फ्लॉप शो कायम राहिला तर त्याच्यावर ही परिस्थिती ओढवू शकते असं जाफर म्हणाला.
आयपीएलनंतर लगेचच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच टी20 सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे सिलेक्ट झाला नाही. दिग्गज खेळाडू विश्रांतीवर असल्याने विराटही संघात नव्हता. अशावेळी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली. यावेळी श्रेयसने तिनही सामन्यात त्याला अर्धशतक झळकावता आलेलं नाही. त्यात संघालाही तीन पैकी केवळ एकच सामना जिंकता आल्याने संघात बदल नक्कीच होणार होते. त्यानुसार आयर्लंड दौऱ्यात श्रेयस संघात नसून आता सूर्यकुमार परतला आहे. त्यात विश्वचषकासाठी विराटचं स्थानही संघात निश्चित असल्याने श्रेयसची जागा धोक्यात आहे.
भारत मालिकेत 2-1 मागे
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खास कामगिरी करत नसल्याचं दिसत आहे. पहिल्या सामन्यात 212 धावांच तगडं आव्हान देऊनही भारताला 7 विकेट्सने सामना गमवावा लागला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात तर भारताने फलंदाजीतही खराब कामगिरी केली आणि सामना 4 विकेट्सने गमावला. तिसऱ्या सामन्यात मात्र फलंदाजीसाठी अवघड असणाऱ्या मैदानावर ऋतुराज आणि ईशानच्या फलंदाजीच्या जोरावर 180 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेला देत त्यांना 19.1 ओव्हरमध्ये केवळ 131 धावांवर सर्वबाद केलं आणि सामना 48 धावांनी जिंकत मालिकेतील आव्हान जिवंत ठेवलं. सध्या भारत मालिकेत भारत सध्या 2-1 ने पिछाडीवर आहे.
हे देखील वाचा-