Video Viral : विराट भाऊची ॲक्शन म्हणजे विषय हार्ड... बुमराहच्या बॉलिंगची नक्कल, व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही पोट धरुन हसाल
Virat Kohli and Ravindra Jadeja Viral Video : कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममधून विराटचा एक मजेदार व्हिडिओ समोर आला आहे.
India vs Bangladesh 2nd Test : जोपर्यंत विराट कोहली मैदानात आहे तोपर्यंत मनोरंजनाची कधी कमी भासत नाही. फलंदाजी करताना तो आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकतो, याशिवाय अनेकवेळा त्याच्या मजेशीर कृतीने चाहत्यांना हसवतो. दरम्यान कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममधून विराटचा एक मजेदार व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो जसप्रीत बुमराहची नक्कल करताना दिसत आहे.
विराटने केली बुमराहच्या ॲक्शनची कॉपी
कानपूर कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. पण, भारतीय संघाची गोलंदाजी सुरू करण्यापूर्वी विराट कोहली मस्तीच्या मुडमध्ये दिसत होता. जिथे विराट कोहली जसप्रीत बुमराहची नक्कल करताना दिसला. विराटच नाही तर रवींद्र जडेजाही असेच काहीसे करताना दिसला.
कोहलीची ही नक्कल पाहून चाहत्यांना हसू आवरता आले नाही. यानंतर जडेजानेही तेच केले. विराट आणि जडेजाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इतकंच नाही तर मैदानावर उपस्थित असलेल्या यशस्वी जैस्वाल आणि सहाय्यक प्रशिक्षक टॅन डेस्कोट हे सगळं पाहून हसत होते.
Virat Kohli and Jadeja mimics Bumrah's bowling action infront of him 😭🤣 pic.twitter.com/fRLvNOFAPG
— Vahini🕊️ (@fairytaledustt_) September 27, 2024
विराट कोहलीला इतिहास रचण्याची संधी
टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इतिहास रचण्याची संधी आहे. कानपूर कसोटीत त्याने 35 धावा केल्या तर विराट 27 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करेल. जर तो हे करण्यात यशस्वी ठरला तर 147 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा क्रिकेटपटू 600 डावांमध्ये 27 हजार धावांचा आकडा गाठेल. तो सर्वात जलद 27 हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज ठरणार आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, कानपूरमध्ये पावसामुळे मैदान ओले झाल्यामुळे सामना सुमारे एक तास उशिराने सुरू झाला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संघात कोणताही बदल केला नाही. रोहितने आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि सिराज या तीन वेगवान गोलंदाजांना संघात कायम ठेवले. तर कुलदीप यादवला घरच्या मैदानावर संधी दिली नाही. दिवसाच्या पहिल्या सत्रात उपाहारापर्यंत भारताने बांगलादेशच्या 74 धावांवर दोन गडी बाद केले होते.
टीम इंडिया प्लेइंग-11 : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
बांगलादेश प्लेइंग-11 : शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद.