(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virat - Anushka Baby Vamika Photo: अनुष्काने शेअर केला मुलीचा पहिला फोटो, मुलीचं नावही सांगितल!
विराट-अनुष्काप्रमाणे या जोडप्याच्या मुलीचे नावही खूप खास आहे. वामिकाचे नाव विराट आणि अनुष्काचे नाव एकत्र करून बनवले आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने विराट कोहली आणि तिच्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोत विराट आणि अनुष्का आपल्या मुलीकडे पाहताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना अनुष्काने मुलीचं नाव देखील सांगितले आहे. विराट आणि अनुष्काने आपल्या मुलीचे नाव वामिका ठेवले आहे. या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव खूप खास ठेवले आहे. विराट अनुष्काचे नाव जोडून मुलीचं तयार केले गेले आहे, परंतु या नावाचा अर्थ देखील खूप पवित्र आहे.
वामिकाचा अर्थ
विराट-अनुष्काप्रमाणे या जोडप्याच्या मुलीचे नावही खूप खास आहे. वामिकाचे नाव विराट आणि अनुष्काचे नाव एकत्र करून बनवले आहे. विराटचा 'व्ही' आणि अनुष्काचा 'का'या नावात समावेश आहे. वामिका देवी दुर्गा यांचे विशेषण आहे. अनुष्का-विराटच्या मुलीच्या फोटोची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. म्हणूनच अनुष्काने पोस्ट शेअर केल्याच्या पाच मिनिटांत या फोटोला लाखोहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.
View this post on Instagram
अनुष्काचे कॅप्शन
मुलीचा पहिला फोटो संस्मरणीय बनवण्यासाठी अनुष्का शर्माने खूप खास कॅप्शन दिले आहे. अनुष्का शर्माने लिहिलं की, "आम्ही प्रेम आणि कृतज्ञतेसह एकत्र राहिलो, पण, या छोट्याशा वामिकाने याला नवीन स्तरावर आणले आहे. अश्रू, हास्य, चिंता, आनंद - या अशा भावना आहेत, ज्या आम्ही एका क्षणात अनुभवल्या आहेत. आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. "
11 जानेवारीला झाला वामिकाचा जन्म
विराटने 11 जानेवारी रोजी बाबा झाल्याची बातमी त्याच्या चाहत्यांनी दिली होती. वडील झाल्यानंतर गोड बातमी सांगताना विराट कोहलीने लिहिले की, “हे सांगताना आनंद होत आहे की आज दुपारी आमच्या घरी मुलीचे आगमन झालं आहे. आम्ही तुमच्या प्रेम आणि शुभेच्छाबद्दल आभारी आहोत. अनुष्का आणि मुलगी दोघेही ठीक आहेत.''