एक्स्प्लोर

Vinod Kambli Health Updates: विनोद कांबळींना नीट बोलता-चालता येईना; भावाने दिली महत्वाची माहिती, म्हणाला, प्रार्थना करा...

Vinod Kambli Health Updates: भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू विनोद कांबळी यांची प्रकृती ठिक नसल्याची माहिती समोर आली आहे.

Vinod Kambli Health Updates: भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू विनोद कांबळी (Vinod Kambli) यांची प्रकृती ठिक नसल्याची माहिती समोर आली आहे. विनोद कांबळींना अजूनही स्पष्ट बोलता येत नाहीय, अशी माहिती त्यांचा भाऊ वीरेंद्र कांबळी यांनी एका प्रॉडकास्टमध्ये दिली. विनोद कांबळी एक चॅम्पियन आहे, तो नक्कीच पुनरागमन करेल. मला विश्वास आहे की तो चालेल, धावेल आणि कदाचित पुन्हा मैदानावरही दिसेल, अशा भावना देखील वीरेंद्र कांबळींनी व्यक्त केल्या. 

वीरेंद्र कांबळी म्हणाले की, विनोद कांबळी सध्या घरी आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे, परंतु त्यांच्यावर उपचार अजूनही सुरू आहेत. विनोद कांबळी अद्याप पूर्णपणे बरे झालेले नाही. त्यांना बोलण्यात अडचण येत आहे. तसेच विनोद कांबळींना नीट चालताही येत नाहीय. त्याला बरं होण्यासाठी वेळ लागेल, पण तो एक चॅम्पियन आहे आणि पुनरागमन करेल, असा विश्वासही वीरेंद्र कांबळींनी व्यक्त केला. मी चाहत्यांना फक्त एवढेच सांगू इच्छितो की तो बरा व्हावा यासाठी प्रार्थना करा. त्याला तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची गरज आहे, असंही वीरेंद्र कांबळींनी सांगितले. दरम्यान, विनोद कांबळींना याआधी युरिन इन्फेक्शन झाले होते. जरी ते नंतर बरे झाले असले तरी डिसेंबरमध्ये ही समस्या पुन्हा वाढली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तपासणीत त्यांच्या मेंदूत एक गाठ आढळली. उपचार आणि देखरेखीनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

विनोद कांबळींना झालेला आजार किती धोकादायक आहे? (Vinod Kambli Health Updates)

विनोद काबळींची प्रकृती गंभीर आहे. कारण त्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त समस्या येत आहेत. लघवीचा संसर्ग, पेटके आणि मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या यामुळे त्याची मज्जासंस्था आणि मूत्रपिंड कमकुवत होत आहेत. बोलण्यात आणि चालण्यात अडचण, अशक्तपणा आणि थकवा यामुळे त्याच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. वेळेवर उपचार न केल्यास मूत्रपिंड निकामी होणे, स्ट्रोक किंवा कायमचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच, त्याचा आजार केवळ एक समस्या नाही तर खूप धोकादायक आहे.

विनोद कांबळींची कारकीर्द-

विनोद कांबळीने 1993 ते 2000 दरम्यान भारतासाठी 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले. विनोद कांबळी 1000 कसोटी धावा करणारा सर्वात जलद भारतीय फलंदाज आहे. हा एक विक्रम आजपर्यंत कायम आहे. 1991 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू करूनही, भारतासाठी 104 एकदिवसीय सामने आणि 17 कसोटी सामने खेळूनही त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द एका दशकापेक्षा कमी काळ टिकली. कांबळीने 17 कसोटी सामन्यात 54.20 च्या सरासरीने 1084 धावा केल्या. यामध्ये चार शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, त्याने 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये 32.59 च्या सरासरीने 2477 धावा केल्या. यामध्ये दोन शतके आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 129 सामन्यांमध्ये 59.67 च्या सरासरीने 9965 धावा केल्या. यामध्ये 35 शतके आणि 44 अर्धशतकांचा समावेश आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Vinod Kambli: विनोद कांबळी कोणात्या आजाराशी झुंज देतोय?; वैद्यकीय अहवाल पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget