(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vijay Mallya meets Chris Gayle: विजय मल्ल्या आणि ख्रिस गेल यांची भेट, फोटो शेअर करताच झाला ट्रोल
Vijay Mallya meets Chris Gayle: टी-20 क्रिकेटमध्ये भल्याभल्या गोलंदाजांना दिवसात चांदणी दाखवणारा वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल गेल्या काही दिवसांपासून आतंरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.
Vijay Mallya meets Chris Gayle: टी-20 क्रिकेटमध्ये भल्याभल्या गोलंदाजांना दिवसात चांदणी दाखवणारा वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल गेल्या काही दिवसांपासून आतंरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. तो सध्या काही फ्रँचायझी लीगमध्ये खेळताना दिसतोय. अलीकडेच उद्योगपती विजय मल्ल्या आणि ख्रिस गेल यांच्यात भेट झाली. या भेटीचा फोटो विजय मल्ल्यानं त्याच्या ट्वीटर हँडलवरुन शेअर केलाय. ज्यानंतर नेटकऱ्यांकडून त्याला प्रचंड ट्रोल केलं जातंय.
विजय मल्ल्यानं ट्विटमध्ये काय म्हटलंय?
नुकताच विजय मल्ल्यानं एक ट्वीट केलंय. ज्यात त्यानं ख्रिस गेलसोबतचा फोटो पोस्ट केलाय. "माझा मित्र युनिव्हर्स बॉस ख्रिस्तोफर हेन्री गेलला भेटून आनंद झाला. जेव्हा मी त्याला आरसीबीमध्ये घेऊन आलो तेव्हापासून आमची खूप चांगली मैत्री आहे." असंही विजय मल्ल्यानं ट्विटरच्या माध्यमातून म्हटलंय. विजय मल्ल्यानं ख्रिस गेलसोबतचा फोटो पोस्ट केल्यावर त्यालाही प्रचंड ट्रोल करण्यात आलंय. चाहत्यांनी कमेंटमध्ये लिहिले की, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लोकांनाही भेटण्यासाठी थोडा वेळ घ्या. एका चाहत्यानं फोटो झूम करून लिहिले की सर, टेबलावर थोडे सॅलड पडले आहेत. या फोटोवर अशाच मजेदार कमेंट्स पाहायला मिळत आहे.
विजय मल्ल्याचं ट्वीट-
नेटकऱ्यांकडून विजय मल्ल्या ट्रोल
विजय मल्ल्यानं ख्रिस गेलसोबतचा फोटो पोस्ट केल्यावर त्यालाही प्रचंड ट्रोल करण्यात आलंय. चाहत्यांनी कमेंटमध्ये लिहिले की, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लोकांनाही भेटण्यासाठी थोडा वेळ घ्या. एका चाहत्यानं फोटो झूम करून लिहिले की सर, टेबलावर थोडे सॅलड पडले आहेत. या फोटोवर अशाच मजेदार कमेंट्स पाहायला मिळत आहे.
ट्वीट-
ट्विट-
ट्विट-
ख्रिस गेलची उत्कृष्ट कामगिरी
ख्रिस गेल 2011 मध्ये आरसीबीमध्ये सामील झाला आणि 2017 पर्यंत फ्रँचायझीसाठी खेळला. आरसीबीमध्ये असताना त्यानं लीगवर वर्चस्व गाजवले. दरम्यान, 91 सामन्यांमध्ये 43.29 च्या सरासरीनं आणि 154.40 च्या स्ट्राइक रेटनं 3420 धावा केल्या. ज्यात 21 अर्धशतके आणि 5 शतकांचा समावेश आहे. तसेच, त्यानं आरसीबीकडून खेळताना पुणे वॉरियर्सविरुद्ध सनसनाटी नाबाद 175 धावा केली होती, जी आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेलनं आंतरराष्ट्रीय टी-20 सह विविध लीगमध्ये सुमारे 15 हजार धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 22 शतके आहेत. यादरम्यान, त्यानं एक हजाराहूंन अधिक षटकार ठोकले आहेत.
हे देखील वाचा-