Virat Kohli Corona Positive: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! बर्मिंगहॅम कसोटीपूर्वी विराटची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विननंतर आता भारताचा मुख्य फलंदाज विराट कोहलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अशा परिस्थितीत आणखी खेळाडूंना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Virat Kohli Corona Positive: बर्मिंगहॅम कसोटी सामन्यापूर्वी भारतीय चाहत्यांच्या चिंतेत भर घालणारी माहिती समोर आलीय. भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विननंतर आता भारताचा मुख्य फलंदाज विराट कोहलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अशा परिस्थितीत आणखी खेळाडूंना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारत आणि इंग्लंड पुढील महिन्यात बर्मिंगहॅम येथे होणार्या एकमेव कसोटीत आमनेसामने येणार आहेत. याआधी भारतीय संघ 24 जूनपासून लीसेस्टर काउंटी संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. मात्र, अश्विन, विराटची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं या सामन्यावर धोक्याचं ढग दाटून आले आहेत.
यापूर्वी भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनलाही कोरोनाची लागण झाली होती. यामुळं तो बाकीच्या खेळाडूंसोबत लंडनला गेला नाही. मात्र, तो आता बरा असून सराव सामन्यापूर्वी तो लीसेस्टरला पोहोचेल अशी अपेक्षा आहे. यातच विराट कोहलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, आता तो बरा असल्याचं समजत आहे. बर्मिंगहॅम कसोटी सामना भारतीय संघासाठी महत्वाचा आहे. यापूर्वी विराटची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.
भारतासाठी धावा करण्याचा दबाव
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेनंतर विराट कोहलीनं कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतरची विराटची परदेशी भूमीवर खेळण्याची पहिली कसोटी आहे.विराट कोहलीवर कर्णधारपदाचे कोणतेही दडपण नसेल. पण एक फलंदाज म्हणून त्याच्यावर चांगली कामगिरी करण्याचं दडपण नक्कीच असेल. कारण गेल्या काही दिवसांपासून विराटचा फॉर्म चिंतेचा विषय ठरत आहे.
आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी
आयपीएलमध्ये अनेक विक्रमाला गवसणी घालणाऱ्या विराट कोहलीसाठी आयपीएलचा पंधरावा हंगाम अतिशय खराब ठरलाय. या हंगामात त्यानं तीन वेळा गोल्डन डकचा शिकार ठरलाय. रॉयल चॅलेंजर्सकडून खेळताना त्यानं 16 सामन्यात 22.73 च्या सरासरीनं 341 धावा केल्या. ज्यात फक्त दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
हे देखील वाचा-